मध्य प्रदेशातील मंदसौर मध्ये चोरांनी शेतातून लंपास केले 30,000 रुपयांचे कांदे
Onions (Photo Credits: IANS)

कांद्याचे भाव दिवसागणिक गगनाला भिडत असताना कांदा (Onion) चोरीच्या घटनांना देखील उधाण आले आहे. इंदूरमध्ये देखील 30,000 रुपये किंमतीचा कांदा चोरी गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंदसौर येथील एका शेतातून चोरांनी 7 क्विंटल कांदे चोरी करून फरार झाले आहेत. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या शेतकऱ्याच्या शेतात चोरी झाली, त्या शेतकऱ्याचे नाव जितेंद्रकुमार असे असून त्यानेच चोरीची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील शिवपुरी गावातील चोरीची घटना ताजी असतानाच आता या राज्यातील आणखी एक चोरीची घटना समोर आली आहे. मंदसौर मध्ये राहणारे जितेंद्रकुमार या शेतकऱ्याने आपल्या १.६ एकर जमिनीत कांदे लावले होते. हे पीक तयार झाले होते आणि जितेंद्रकुमार हे कांदे काढण्याच्या तयारीतच होते. मात्र, त्या रात्रीच चोरीची ही घटना घडली.

हेदेखील वाचा- महागाईच्या दिवसात चोरट्यांकडून मध्य प्रदेशात 25 लाख तर सुरत येथून 250 किलो कांद्यावर डल्ला

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील शिवपुरी मध्ये चोरांनी एका ट्रक मधून जवळजवळ 25 लाख रुपयांचा कांदा चोरला होता. तर पश्चिम बंगाल येथून 100 किलो आणि सुरत मधून 250 किलोचा कांद्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती देत सांगितले की, नाशिकचे व्यापारी प्रेमचंद शुक्ला यांनी गोरखपुर येथे 25 लाख रुपयांचा कांदा पाठवला होता. त्याच दरम्यान चोरट्यांनी ट्रक पळवून त्यामधील कांदा गायब होता.

सध्या कांद्याचे दर प्रतिकिलो 150 रुपये इतका आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच चाप बसला असून गृहिणींचे बजेटही कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यात या चोरीच्या घटनांचे स्वरुप पाहता जर कांद्याचे दर असेच वाढत राहिले तर पुढचे चित्र कसे असेल हे सांगणे अवघड होऊन बसणार आहे.