Man Stitches Wife's Genitals: पत्नीचे गुप्तांग धाग्यांनी शिवले, विकृत पतीचे संशयातून कृत्य
Woman Genitals | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

विकृत पतीने आपल्या पत्नीचे गुप्तांग (Woman Genitals) धाग्यांनी शिवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील सिंगरौली (Singarauli) जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पीडित पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विकृत पतिने केवळ संशयातून पत्नीचा प्रायव्हेट पार्ट (Private Part) शिवल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. विकृत पती आपल्या पत्नीसोबत सिंगरौली येथील रैला गावात राहात होता. त्याला आपली पत्नी परपुरुषासोबत शरीसंबंध ठेवत असल्याचा संशय होता. या संशयातूनच त्याने पत्निचे गुप्तांग (Sex Organ) हे कृत्य केले. घडल्या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.

सिंगरौली येथील सहायक पोलीस अधीक्षक अनिल सोनकर यांनी एनडीटीव्हीला या प्रकरणाबद्दल माहिती देताना सांगितले की, आरोपीच्या पत्नीकडून घडल्या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पती फरार आहे. पीडित महिलेने पोलिसांनी सांगितले की, ती आपल्या पतीविरुद्ध कोणत्याही प्रकारची कडक कारवाई पोलिसांकरवी करु इच्छित नाही. पीडितेची पोलिसांना इतकीच विनंती आहे की पतीने यापुढे अशा प्रकारचे वेदानादाई कृत्य पुन्हा करु नये अशी समज त्याला (पतीला) द्यावी. जेनेकरुन पती भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करणार नाही. (हेही वाचा, रात्रीच्या काळोखात बायकोने कापले नवऱ्याचे गुप्तांग)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पती सध्या फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत. तसेच, या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

दरम्यान, या आधीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. अनेकदा महिलांनीही त्यांच्या पतीचे गुप्तांग कापल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. पती-पत्नीच्या वादातून, एकमेकांवरील संशयातून, एकमेकांवर होणाऱ्या लैंगिक जबरदस्तीतून अनेकदा अशा घटना घडतात. अनेकदा काही मंडळी विकृत विचारांतूनही अशी कृत्ये करत असल्याचे काही घटनांतून पुढे आले आहे. अनेकदा बेरोजगारी, वाढती व्यसनाधिनता, पोर्नोग्राफी आदी कारणांमुळेही नागरिकांमध्ये विकृती वाढत असल्याचे काही अभ्यासकांचे म्हणने आहे.