मध्य प्रदेश: लग्न लावून दिलेल्या भटजीसोबतच पळाली नवरी, लाखो रुपयांचे दागिने लांबवले
Marriage (Image used for representational purpose only)

लग्न लावून देणाऱ्या भटजीसोबतच लग्नाच्या दुसऱ्या आठवड्यात नववधू पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे तिच्या परिवाराला मोठा धक्का बसला. तसेच मुलीने पळून जाताना घरातून चोरी करत लाखो रुपयांचा ऐवज पळवला आहे.

मध्य प्रदेशातील सिरोंज शहरात निवडणूक निकालावेळी ही नवरीमुलगी तिच्या लग्नातील भटजीसोबतच पळाली. तसेच या दोघांचे दोन वर्ष प्रेमसंबंध सुद्धा असल्याचे तपासणीनंतर समोर आले. एवढेच नसून मुलीने लाखो रुपयांच्या दागिन्यांसह तीस हजार रुपयांची रोकड लांबवली.

(पश्चिम बंगाल मध्ये भाजपा कार्यकर्त्यावर अज्ञातांकडून गोळीबार, 24 वर्षीय तरुणाने गमावले प्राण)

तर पळून गेलेल्या भटजीचे यापूर्वी एक लग्न झाले असल्याचे समोर आले. तसेच या भटजीला दोन मुलेसुद्धा आहेच. मात्र त्याचे हे कुटुंब बेपत्ता असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.