BJP Worker Shot Dead In West Bengal: पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये एका भाजपा कार्यकर्त्यावर गोळीबार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. चंदन शॉ (Chandan Shaw) नामक 24 वर्षीय तरुण भाजपा समर्थक बाईक चालवत असताना अचानक काही अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्यावर बंदुकीचा नेम साधला.या हल्य्यानानंतर उत्तर 24 परगना जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीती दिसून येतेय. बंगालमधील स्थानिक राजकीय पक्ष तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) व भाजपाच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडली असा आरोप चंदन याच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे तर या पाठीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येची ही सलग तिसरी घटना आहे, या पूर्वी बंगाल मध्येच चकदहा येथे शांतू घोष नामक तरुणाची हत्या करण्यात आली होती तर उत्तर प्रदेशातील अमेठी येथे स्मृती इराणी यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याच्या खुनाने सर्वत्र तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.त्यात आता चंदन याच्या मृत्यूने परिस्थिती आणखीनच वाईट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. यासाठी खबरदारी म्हणून 24 परगना जिल्ह्यात सुरक्षा जवानांची तुकडी सज्ज करण्यात आली आहे. अमेठी: स्मृती ईराणी यांच्या सुरेंद्र सिंह नामक निकटवर्तीय कार्यकर्त्याची गोळी मारुन हत्या
ANI ट्विट
West Bengal: A BJP worker, Chandan Shaw, was shot dead by unidentified assailants late last night in Bhatapara of North 24 Parganas district. Security forces have been deployed in the area. Investigation has started.
— ANI (@ANI) May 27, 2019
या संदर्भात तपास चालू असताना पोलिसांनी बिश्वास नामक एका 25 वर्षीयतरुणाला ताब्यात घेतली आही, घटना घडतेवेळी आपण तिथे उपस्थित होतो पण मोबाईलमध्ये पाहत असल्याने नेमकी माहिती नसल्याचे बिश्वास याने माध्यमांना सांगितले होते. दरम्यान पोलिसांचा तपास सुरू असून चंदन याच्या मारेकऱ्यांचा कोणताही पुरावा अद्याप हाती लागलेला नाही.
बंगाल मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारपासूनच तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळत होती, अमित शाह यांच्या रोड शो मध्ये देखील या तणावाचा पुरेपूर प्रत्यय आला होते. 23 मे ला निकाल जाहीर झाल्यावर भाजपा ने बंगाल मधील तब्बल 18 जागांवर ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले यानंतर तर TMC व भाजपाच्या कार्यकर्त्यांमधील वादाला आणखीनच जोर चढला.