Lucknow: लखनौ मध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा तुफान वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना स्मशानात जागाच मिळत नाही आहे. अशाच प्रकारची एक घटना समोर आली असून कोरोना संक्रमित मृतदेहासाठी जागा न मिळाल्याने नातेवाईकांनी तो स्मशनातभुमीत तसाच ठेवून निघून गेले. त्यामुळे रात्री 12 वाजता सफाई कर्मचाऱ्यांनी मिळून मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याची बाब समोर आली आहे.(कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ट्रेन चालवण्यासंदर्भात रेल्वेने स्पष्ट केली 'ही' मोठी बाब, तुम्ही सुद्धा जाणून घ्या)
प्राप्त झालेल्या माहितीनुसार. लखनौ मध्ये आलमबाग क्षेत्रातील नहर शवदाह गृहाच्या येथे कोरोनाच्या रुग्णांचा मृतदेह जाळण्यासाठी खुप प्रयत्न केल्यानंतर तेथे दाखल होत आहेत. येथे जवळजवळ 60 मृतदेहांवर दररोज अंत्यंसंस्कार केले जातात. स्मशानभुमीत मृतदेह जाळण्यासाठी वाट पहावी लागत असल्याने लोक आपल्या नातेवाईकांचे मृतदेह तेथेच सोडून निघून जात आहेत.
आलमबाग येथील नहर शव गृहात काम करणाऱ्या नितिन पंडित जोकि येथे अंत्यंसंस्कार करण्याचे काम करतात. त्यांनी असे म्हटले आहे की, संध्याकाळी उशिरा गोरखपुर येथून कोरोना संक्रमण असलेला मृतदेह अंत्यंसंस्कारासाठी आणला होता. त्यावेळी तेथे जागा नव्हती. यासाठी त्यांना वाट पहाण्यासाठी सांगितले. मात्र थोड्यावेळाने पाहिले असता स्मशानभुमीच्या गेटवर मृतदेह तसाच होता पण नातेवाईक दिसून आले नाहीत.(राजस्थान मध्ये 16 ते 30 एप्रिल पर्यंत संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू)
तर खुप वेळ वाट पाहिली पण कोणीही आले नाही. यानंतर रात्री 12 वाजता सफाई कर्मचाऱ्यांनी मिळून त्या मृतदेहावर अंत्यंसंस्कार केले. तर माजी नगरसेवक भुपेंद्र सिंह यांच्या मते, मृतांसाठी प्रशासनाकडून कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. कोविड19 च्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुद्धा खुप समस्या येत असून जागा सुद्धा मिळत नाही आहे.