एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली असुन 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 198 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. देशातील विविध शहरात आजपासून एलपीजी सिलिंडरचे नवे दर लागू होणार आहेत. तर जाणून घ्या तुमच्या शहरात LPG Cylinder खरेदीसाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील.
Indian Oil Corporation ने आज त्यांच्या अधिकृत Website वरुन LPG व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नव्या किमतीची घोषणा केली आहे. Indian Oil Corporation च्या नव्या दराप्रमाणे LPG व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 198 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक स्तरावरील नागरिकांना या नव्या दराचा मोठा फायदा होणार असुन महिन्याच्या सुरवातीला ही सामान्यांना ही दिलासादायक बातमी आहे. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी २२१९ रुपयां ऐवजी आता २०२१ रुपयांना हा सिलेंडर खरेदी करता येणार आहे. ( हेही वाचा : EV Charging Stations: महावितरण 2025 पर्यंत राज्यभरात सुरु करणार 2,375 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती स्थानके)
Commercial 19 kg LPG cylinders' prices reduced by Rs 198 in Delhi with effect from July 1st. 19kg commercial LPG cylinder will now cost Rs 2021. Earlier it was Rs 2219.
— ANI (@ANI) July 1, 2022
नव्या दरानुसार १९ किलो व्यवसायिक सिलेंडरची किंमत दिल्लीत 2219 रुपये, मुंबईत 2021, कोलकता 2140 तर चेन्नई 2186 असणार आहेत. घरगुती सिलेंडच्या किमतीत गेल्या दोन महिन्यात कुठलाही बदल बघायला मिळाला नाही. मुंबईत घरगुती सिलेंडर खरेदीसाठी १००२ रुपये मोजवे लागत असुन सामान्य नागरिक किमतीच्या कपातीच्या प्रतिक्षेत आहेत.