Lok Sabha Election 2024: दुसर्‍या टप्प्यातील मतदानाचा आज थांबणार प्रचार; 13 राज्यात 89 जागांवर 26 एप्रिलला मतदान
Voting | Twitter

भारतात 26 एप्रिल दिवशी 13 राज्यात 89 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी आज या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी (26 एप्रिल) बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी मध्ये मतदान होणार आहे. तर देशामध्येही केरळच्या वायनाड मध्ये राहुल गांधी लढत असलेल्या मतदारसंघाचं मतदान 26 एप्रिल दिवशी आहे. या सोबतच हेमा मालिनी, भूपेश बघेल, राजीव चंद्रशेखर, दानिश अली या दिग्गजांसाठी देखील मतदान होणार आहे. महाराष्ट्रामध्ये नवनीत राणा, प्रकाश आंबेडकर यांचं राजकीय भवितव्य मतदान पेटी मध्ये बंद होणार आहे.

भारतामध्ये 19 एप्रिल ते 1 जून अशा कालाखंडात 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 5 जागांवर मतदान झाले आहे. त्यावेळी 60%  च्या  आसपास मतदान झाले आहे. आता दुसर्‍या टप्प्यात 26 एप्रिल दिवशी मतदान आहे. नक्की वाचा: Solapur Lok Sabha 2024: राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ सोलापुरात जाहीर सभा .

सध्या उन्हाचा वाढता पारा, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आलेल्या मतदानाचा तारखा यामुळे मतदारांना मोठ्या संख्येत मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं आव्हान आहे. दरम्यान यंदा निवडणूक आयोगाने 85 वरील वयोवृद्धांना आणि 40% पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्यांना घरबसल्या मतदान करण्याची सोय आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा फायदा पर्यटनासाठी न घेता मतदानासाठी करण्याचं आवाहन आहे.