Lion Attack in Gujarat: अमरेली येथे 8 वर्षीय मुलीवर सिंहाचा हल्ला, मृत्यू
Lions test positive for COVID-19 (Photo Credits: Pixabay)

Lion Attack in Gujarat:  गुजरात मधील अमरेली येथील गोरखडा गावात शुक्रवारी एका झोपलेल्या 8 वर्षीय मुलीवर सिंहाने हल्ला केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, आपली मुलगी बेपत्ता झाल्याचे पालकांना कळल्यानंतर ही घटना समोर आली आहे. त्यांना मुलीचे आजूबाजूच्या परिसरात शरिराची काही भाग सापडल्याचे सांगण्यात आले आहे.(Rabies Case: केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात 7 वर्षाच्या मुलाचा रेबीजमुळे मृत्यू, 1 महिन्याआधी कुत्र्याने घेतला होता चावा)

मुलीचे पालक हे स्थलांतरित कामगार असून ते अन्य जणांसोबत दोन सिंह दिसून आलेल्या ठिकाणी  होते. जेव्हा त्यांना आपली मुलगी हरविली असून कुठे भेटत नसल्याचे कळताच त्यांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना तेथे दोन सिंह सुद्धा दिसून आल्याची माहिती वनविभागाने हिंदू यांना दिली आहे.

रिपोर्ट्सनुसार, स्थानिक वनाधिकाऱ्यांनी म्हटले सिंहांनी त्या मुलीला घेऊन जाताना कोणीही पाहिलेले नाही. परिस्थितीजन्य पुराव्यावरुन असे दिसून आले की, तिच्यावर प्राण्याने हल्ला केला आहे. मुलगी तिच्या परिवारातील मंडळीसोबत अशीच उघड्यावर झोपली असता ही घटना घडली आहे.(सासूच्या हत्येसाठी प्रियकराच्या मदतीने विषारी सापाचा वापर; राजस्थान मध्ये सर्पदंशाने खून घडवून आणण्याचा नवा ट्रेंड असल्याचं सर्वोच्च न्यायलयाचं मत) 

अशाच प्रकारची एक घटना मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी घडली होती. धार जिल्ह्यात दोन वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. ती खेळत असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. हल्ला केल्यानंतर मुलीच्या घरातल्यांनी बिबट्यावर चप्पल फेक करत त्याला पळवून लावले. तर मंगळवारी त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.