कोलकाता:  रेस्टॉरंट मालकाने COVID19 च्या पार्श्वभुमीवर लढवली नवी शक्कल, ग्राहकांना दिले जातायत Zip असलेले फेस मास्क
Zip Face Mask (Photo Credits- ANI)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) सर्वत्र थैमान घातले असून दिवसागणिक रुग्णांचा  आकडा हजारोंच्या संख्येने वाढतच चालला आहे. मात्र याच पार्श्वभुमीवर कोरोनाचे संकट कधी संपेल याचा काही नेम नाही पण सरकारने आता लॉकडाऊन हळूहळू हटवत अनलॉकिंग नुसार टप्प्याटप्प्याने काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तर नुकत्याच अनलॉकिंग-5  नुसार रेस्टॉरंट, बार, सिनेमागृह सुरु करण्यास परवागनी दिली आहे. त्यामुळे नागरिक आता घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. मात्र कोरोनाचे संकट अद्याप असून नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. याच दरम्यान कोलकाता (Kolkata) येथील एका रेस्टॉरंट मालकाने आपल्या ग्राहकांचा कोरोना पासून बचाव व्हावा यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यानुसार रेस्टॉरंट मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला झीप असलेले फेस मास्क  (Zip Face Mask) दिले जात आहेत.

रेस्टॉरंट मालकाने असे म्हटले आहे की, रेस्टॉरंट मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला फेस मास्क दिले जात आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क ही आम्ही आकारत नाहीत. पण हे अनिवार्य नसून  त्यांना घालायचे असल्यास ते घालू शकतात. तर कोरोनाच्या काळात रेस्टॉरंट मालकाने घेतलेला हा निर्णय त्यांच्यासह ग्राहकांसाठी नक्कीच फायद्याचा ठरु शकतो. कारण देशभरातील प्रत्येक रेस्टॉरंट, हॉटेल मध्ये प्रवेश करणाऱ्या ग्राहकांची  बसण्याची जागा निर्जंतुकीकरण केली जाते. तसेच कोरोनाचे सर्व नियमांचे सुद्धा यावेळी पालन केले जात असल्याचे दिसून येत आहे.(भारतात हिवाळ्यात कोविड-19 संसर्गाची दुसरी लाट येणार? पहा, काय म्हणाले नीती आयोगाचे सदस्य Dr. V. K. Paul)

याआधी सुद्धा हॉटेल्स मध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये कोरोना संबंधित जनजागृती करण्यासाठी फेस मास्कच्या आकाराचे पदार्थ बनवून दिले जात असल्याचे समोर आले होते. तर आता सुद्धा नागरिकांनी कोरोनाच्या काळात अधिक काळजी घ्यायची आहेच. पण गर्दीच्या ठिकाणी सुद्धा जाण्याचे टाळावे असे ही आवाहन वारंवार करण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनावरील लसी संदर्भात बोलायचे झाल्यास त्यावर अद्याप अभ्यासासह संशोधन केले जात आहे. देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 74 लाखांच्या पार गेला आहे.