
केरळ राज्यातील कोची (Kochi News) येथील कलूर परिसरात असलेल्या एका खासगी मार्केटींग कंपनीवर कर्मचाऱ्यांचा छळ (Workplace Harassment) केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरुन (Kerala Viral Video) हा आरोप होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, गळ्यात पट्टा असलेले काही लोक गुडघ्यांवर रांगत आहेत आणि कुत्र्यासारखे नाणी चाटत आहेत. कथितरित्या रांगणारे हे लोक कंपनीचे कथीतरित्या कर्मचारी (Employee Abuse) आहेत. सदर कर्मचारी त्यांना कंपनीने दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले, त्यामुळे व्यवस्थापनाने त्यांना शिक्षा दिली, असा दावा केला जात आहे. या घटनेची केरळचा कामगार विभाग (Labour Department Kerala) आणि मानवी हक्क आयोगानेही (Human Rights Violation) दखल घेतली आहे.
कामगार मंत्र्यांकडून प्रकरणाची गंभीर दखल
कंपनी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसोबत केलेल्या कथीत वर्तनाचा एक व्हिडिओ स्थानिक टीव्ही चॅनेल्सद्वारे प्रसारित करण्यात आला. ज्या दृश्यांमुळे संताप निर्माण झाला आणि केरळच्या कामगार विभागाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली. राज्याचे कामगार मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी या घटनेचा निषेध केला, या दृश्यांना 'धक्कादायक आणि त्रासदायक' म्हटले आणि सविस्तर चौकशीचे आदेश दिले. त्यांनी जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. (हेही वाचा, Mumbai Women's Drug Party Video: मुंबई येथे महिलांची ड्रग्ज पार्टी; म्हणे, 'नो सिगारेट, डोकं जड होतं', खरेदीचा दरसुद्धा सांगितला)
कंपनी मालकाने फेटाळला दावा
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना पेरुम्बवूर येथे कलूर येथील मार्केटिंग कंपनीशी संबंधित असलेल्या एका फर्ममध्ये घडली. पोलिसांना अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार मिळालेली नसली तरी, त्यांनी चौकशी सुरू असल्याचे पुष्टी केली. कलूर फर्मच्या मालकाने थेट सहभाग नाकारला आणि असा दावा केला की कथित गैरवर्तन त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करणाऱ्या संलग्न आउटलेटमध्ये झाले असावे.
Kerala Employee treated like animal in Kochi A belt was tied around the neck for not completing the target Shameful act of a private marketing company video #viral on social media Police started investigating the matter #Kerala #Kochi #BREAKING #BreakingNews #LatestNews #latest pic.twitter.com/QLviimETKa
— Indian Observer (@ag_Journalist) April 6, 2025
अद्याप गुन्हा दाखल नाही
मीडिया चॅनेलशी बोलताना कर्मचाऱ्यांनी दावा केला की, विक्रीचे लक्ष्य पूर्ण करण्यात अयशस्वी झालेल्यांना कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून अनेकदा अपमानास्पद शिक्षा देण्यात येत होती. दरम्यान, अधिकाऱ्यांनी अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की फुटेजची पडताळणी करण्यासाठी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढील चौकशी केली जात आहे.
दरम्यान, संबंधित घटनेत, उच्च न्यायालयाचे वकील कुलथूर जयसिंग यांच्या तक्रारीनंतर राज्य मानवाधिकार आयोगाने गुन्हा दाखल केला. केरळ राज्य युवा आयोगानेही स्वतःहून दखल घेतली आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. घटनेचा निषेध करताना, आयोगाचे अध्यक्ष एम शजर म्हणाले, 'अशा पद्धती लोकशाही समाजात पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. कॉर्पोरेट शिस्तीच्या नावाखाली अशा समाजविरोधी वर्तनाचा प्रसार रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई केली पाहिजे.'