Kill | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारताचं नंदनवन असलेल्या कश्मीरच्या खोर्‍यात अजून एक कश्मीरी पंडित दहशतवाद्यांचं लक्ष्य ठरला आहे. जम्मू कश्मिर मधील Shopian येथे Chotipora च्या apple orchid मध्ये राहणार्‍या दोन भावांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी अवस्थेमध्ये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मृत व्यक्तीचं नाव सुनील कुमार आहे तर जखमी पितांबर वर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनीलचा मृत्यू घटनास्थळी झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दोघेही भाऊ त्यांच्या जुन्या वडीलोपार्जित घरात राहत होते. मागील काही महिन्यांपासून कश्मिरी पंडितांवर होणारे हल्ले हा चिंतेचा विषय बनला आहे. अनेकदा हिंदूंना लक्ष्य केले जाणं यावरून कश्मिरी पंडितांनी आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला आहे. Jammu and Kashmir Lt. Governor Manoj Sinha यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

पहा ट्वीट

(हे देखील नक्की वाचा: Jammu Kashmir Attack: काश्मिरी पंडितांवर दहशतवाद्यांचा हल्ला, 24 तासांत तिसरी घटना).

पोलिसांकडून दहशतवाद्यांनी गोळीबार केलेल्या भागाची कसून चौकशी सुरू आहे. या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आणि सुरक्षा व्यवस्थेसमोर आहे. दरम्यान कश्मीर मध्ये बिगर स्थलांतरित पंडीतांवर हल्ला झालेला हा दुसरा प्रकार आहे. सोमवारी जेव्हा भारत 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत होता तेव्हा बडगाम मध्ये एका घरावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला देखील केला आहे.