Jammu Kashmir Attack: काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandits) पलायनाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात काश्मिरी पंडित यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम राबवली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आज दहशतवाद्यांनी एकापाठोपाठ तीन हल्ले केले. शोपियानमध्ये रात्री आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडिताच्या दुकानदारावर गोळीबार करून त्यांना जखमी केले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दहशतवादी हल्ल्यात चोटीगाम गावातील बाल कृष्णा यांच्या हाताला आणि पायाला जखमा झाल्या आहेत. त्यांना श्रीनगरमधील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे घोषित केले. (हेही वाचा - Attack on Gorakhnath Temple: गोरखनाथ मंदिरावरील हल्ला दहशतवादी कट असल्याचा संशय; UP सरकारने ATS कडे सोपवला तपास)
अधिकाऱ्यांनी सांगितले की, काश्मीर पंडित दुकानदारावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांना गावात पाठवण्यात आले. यापूर्वी, श्रीनगरच्या मैसुमा भागात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) एक जवान शहीद झाला होता, तर दुसरा जवान जखमी झाला होता. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
Jammu & Kashmir | Two CRPF jawans injured in a terrorist attack at Maisuma in Lal Chowk, Srinagar.
— ANI (@ANI) April 4, 2022
दहशतवाद्यांनी मैसुमा येथे सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केला. ज्यात दोन जवान जखमी झाले. जखमींना SMHS रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी एका जवानाला मृत घोषित केले, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम राबवली जात आहे.