Attack on Gorakhnath Temple: गोरखनाथ मंदिरात (Gorakhnath Temple) रविवारी संध्याकाळी पीएसी जवानांवर झालेल्या हल्ल्यामागेही दहशतवादी कारस्थान असू शकते. या घटनेचा दहशतवादी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे उत्तर प्रदेश पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, यूपी सरकारने या घटनेचा तपास एटीएसकडे सोपवला आहे.
मुंबईतून इंजिनीअरिंग केलेल्या मुर्तझा या आरोपीने मुख्यमंत्री योगींच्या मठाबाहेरील सुरक्षा रक्षकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यावेळी तो धार्मिक घोषणाही देत होता. धारदार शस्त्रांचा वापर करत त्याने मंदिरातही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. एएनआयशी बोलताना, अतिरिक्त महासंचालक (एडीजी) कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सोमवारी सांगितले, "एका व्यक्तीने जबरदस्ती मंदिर परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. अहमद मुर्तजा अब्बासी असे आरोपीचे नाव असून तो गोरखपूरचा रहिवासी आहे. (हेही वाचा - Ashok Tanwar Joins AAP: काँग्रेसचे माजी नेते अशोक तंवर यांचा मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश)
एडीजी यांनी पुढे सांगितलं की, “हे प्रकरण एडीएसकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या घटनेचा सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे." गोरखपूरचे एसएसपी विपिन टाडा म्हणाले, "आरोपींनी धार्मिक घोषणा देत गोरखनाथ मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याला रोखले." सध्या दोन जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
IIT Mumbai Chemical Engineer Ahmed Murtaza attacked the security personnel of Gorakhpur Gorakshanath temple @iitbombay
This is the result of continuous targetting of Yogi gvt by liberals & leftists and poisoning minds of youth of this country with so much of hatred & false news. pic.twitter.com/TjWdx0bjyl
— Vishnu Vardhan Reddy (@SVishnuReddy) April 4, 2022
UP | ATS & STF is probing the whole matter, we're in contact with all the agencies. The accused tried to enter from a safe place chanting religious slogans & attacked police personnel with a sharp weapon, which resulted in serious injuries: ADG Law & Order Prashant Kumar pic.twitter.com/0X7orGSWaf
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 4, 2022
एसएसपी पुढे म्हणाले की, आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 301 (हत्येचा प्रयत्न) शिवाय इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी या घटनेचा निषेध केला असून सरकारने या घटनेची दखल घेतली असल्याचे सांगितले आहे.