Hugging | Representative Image | (Photo Credits: Pixabay)

कर्नाटकातील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभात एकमेकांना मिठी मारुन परस्परांचे चुंबन (Students Buspended for Hugging and Kissing) घेतल्याबद्दल दोन विद्यार्थ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेत मुलगा मुस्लिम आणि मुलगी हिंदू आहे. या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा झाल्यानंतर या घटनेने धार्मिक वळण घेतले.

घडलेल्या घटनेबद्दल सोशल मीडियावरुन माहिती मिळताच हिंदु संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हे कार्यकर्ते हिंदू मुलीसोबत रोमान्स केल्याबद्दल त्या मुलाची चौकशी करत असल्याचेही वृत्त आहे. (हेही वाचा, Types Of Kisses: जोडीदारासोबतचे नाते आणखी घट्ट करण्यास मदत करतील हे 7 प्रकारातील चुंबन)

एका खासगी महाविद्यालयात घडलेल्या या प्रकारानंतर व्यवस्थापनाने बेलथनगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच विद्यार्थ्याविरोधात सोशल मीडियावर आणि ऑनलाईन प्रकारे मोहीम राबविणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली.

ट्विट

दरम्यान, प्रकरणाला जातीय वळण मिळाल्यानंतर दोन्ही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून निलंबित करण्यात आल्याचे महाविद्यालयाने म्हटले. सूत्रांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी गेल्या आठवड्यात बेलथनगडी शहरात एका पुस्तक प्रकाशन समारंभाला हजेरी लावली तेव्हा विद्यार्थ्यांनी हे वर्तन केले.

या प्रकरणात हिंदू विद्यार्थिनीला महाविद्यालयातून निलंबित करण्यात आल्याचा आरोप हिंदू कार्यकर्त्यांनी केलाआहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु आहे.