Kanhaiya Kumar यांनी CPI कार्यालयातून AC ही काढून नेला; काँग्रेसमध्ये प्रवेशाची शक्यता
Kanhaiya Kumar | (Photo Credits: Facebook)

जेएनयू मधील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष (Former JNU students' union president) मधील माजी विद्यार्थी आणि सीपीआय (CPI) नेता कन्हैय्या कुमार हा काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पाठीमागील काही दिवसांपासून ही चर्चा जोरदार रंगली आहे. दरम्यान, कन्हैय्या कुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI Office) कार्यालयातून त्यांच्या द्वारे लावण्यात आलेली वातानुकूलक यंत्रणा (एअर कंडीशनर- AC ) काढून नेल्याचे वृत्त आहे. सीपीआय बिहार सचिव राम नरेश पांडेय यांनी मंगळवारी (28 सप्टेंबर) ही माहिती दिली. सीपीआयच्या पटना येथील कार्यालयात कन्हैय्या कुमार यांनी आपल्यासाठी एसी (Air Conditioner) लावला होता. तो त्यांनी काढून नेला आहे.

पांडेय यांनी सांगितले की, आम्ही त्यांना एसी काढून नेण्यापासून रोखले नाही. कारण तो एसी त्यांनी स्वत: आपल्या पैशातून लावला होता. दरम्यान, कन्हैय्या कुमार हे काँग्रेस पक्षात सहभागी होण्याचा आपला निर्णय मागे घेतील असा विश्वास पांडेय यांनी व्यक्त केला. पांडेय यांनी म्हटले की, कन्हैय्या कुमार यांची विचारधारा कम्युनिस्ट आहे. कम्युनिस्ट विचारांचे लोक आपल्या विचारधारेपासून मागे हटत नाहीत. (हेही वाचा, Congress च्या पंजात Kanhaiya Kumar; 28 सप्टेंबरला पक्षप्रवेश; राहुल गांधी यांच्या वर्तुळात स्थान मिळण्याची शक्यता)

Kanhaiya Kumar (Photo Credits: Facebook)

पांडेय यांनी पुढे बोलताना सांगितले, कन्हैय्या कुमार हे 4 आणि 5 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेत सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी पक्ष सोडण्याचे कोणतेही संकेत दिले नव्हते. त्यांनी पक्षात विशेष पदाची मागणी केली होती.

जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि गुजरात येथील राष्ट्रीय दलीत अधिकार मंच नेता जिग्नेश मेवानी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Kanhaiya Kumar | (Photo Credits: Facebook)

कन्हैय्या कमार हे सीपीआयचे नेशनल एक्जीक्यूटिव काउंसिल चे सदस्य आहेत. नेशनल एक्जीक्यूटिव काउंसिल ही सीबीआयची पक्षांतर्गत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. तर मेवानी हे गुजरातमधील वडगाम विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते राष्ट्रीय दलित अधिकार मंचाचे संयोजकही आहेत. विधानसभा निवडणूक 2017 मध्ये त्यंनी अपक्ष निवडणूक लढवली. तसेच, या निवडणुकीवेळी काँग्रेसने जिग्नेश यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता.