
जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी (JNU) तील माजी विद्यार्थी आणि सीबीआय नेता कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणार आहे. येत्या 28 सप्टेंबरला हा पक्षप्रेवेश पार पडणार आहे. कन्हैय्या कुमार याच्यासोबतच गुजरात राज्यातील दलित नेता आणि अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी (Jignesh Mevani) हे देखील काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. जर कन्हैय्यासोबत हा प्रक्षप्रवेश पार पडला नाही तर येत्या 2 ऑक्टोबर रोजी हा पक्ष प्रवेश होण्याची शक्यात वर्तवली जात आहे. दोन्ही नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul-Gandhi) आणि प्रियंका गाधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कन्हैय्या कुमार हा लढवय्या नेता आहे. त्याने या आधी लोकसभा निवडणूक लढवली आहे. भाजप नेते गिरीराज सिंह यांच्यासोबत झालेल्या अटितटीच्या निवडणुकीत बेगुसराय लोकसभा मतदारसंघात त्याचा पराभव झाला. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करतो. आक्रमक, अभ्यासू आणि मुद्देसूद भाषण ही त्याची खास वैशिष्ट्ये आहे. जाहीर व्यासपीठावरुन तो भाजपला आव्हान देतो. इतकेच नव्हे तर अनेकदा त्याने भाजप नेत्यांना निरुत्तर केले आहे.

आगामी काळात गुजरात, उत्तर प्रदेश या प्रमुख राज्यांसह जवळपास 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडते आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस वोट बँक आणि इतर मुद्द्यांवर बारीक लक्ष देताना दिसत आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला प्रवाहात घेऊन नेतृत्व देण्याची काँग्रेसची भूमिका आहे. प्रत्येक राज्यात एक दलीत मते निर्णाय ठरत असतात. (हेही वाचा, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसच्या वाटेवर, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची दुसऱ्यांदा भेट; 2 ऑक्टोबरला पक्षप्रवेश होण्याची शक्यता)

कन्हैय्या कुमार जेव्हा काँग्रेस पक्षात सहभागी होईल तेव्हा अपेक्षीत आहे की, ते आपल्यासोबत काही इतरही डाव्या पक्षांना सोबत घेऊन जातील. जिग्नेश मेवाणी आणि कन्हैय्या कुमार हे काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची बातमी 2022 मध्ये होणाऱ्या 2024 लोकसभा निवडणुकीच्या आगोदर काँग्रेस तरुण चेहऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे दर्शवते.

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जिग्नेश मेवानी यांच्या काँग्रेस प्रवेशाने गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष हार्दिक पटेल हे देखील खूश आहेत. जिग्नेश हे येत्या 28 किंवा 2 ऑक्टोबरला पक्ष प्रवेश करतील. काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमं म्हणतात की, काँग्रेसने विहार विधानसभेच्या दरम्यानच कन्हैय्या कुमार याला ऑफर दिली होती. मात्र, तेव्हा हा पक्ष प्रवेश शक्य झाला नाही.