कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसच्या वाटेवर, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची दुसऱ्यांदा भेट; 2 ऑक्टोबरला पक्षप्रवेश होण्याची शक्यता
Kanhaiya Kumar Jignesh Mevani Rahul Gandhi Priyanka Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) आणि गुजरात (Gujarat) मधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mewani) लवकरच काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. हा पक्ष प्रवेश येत्या 2 ऑक्टेबरला पार पडेल अशी सूत्रांची माहिती आहे. एनटीव्ही या वृत्तवाहीनीने काँग्रेसमधील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. या दोघांचाही पक्ष प्रवेश 28 सप्टेंबर रोजी पार पडणार होता. मात्र, काही कारणांमुळे ही तारीख आणखी पुढे ढकलण्यात आली. गुजरातच्या वडगाम मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणाऱ्या जिग्नेश मेवानी यांनी गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केले जाण्याची शक्यता आहे.

आगामी काळात गुजरात, उत्तर प्रदेश या प्रमुख राज्यांसह जवळपास 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडते आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस वोट बँक आणि इतर मुद्द्यांवर बारीक लक्ष देताना दिसत आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला प्रवाहात घेऊन नेतृत्व देण्याची काँग्रेसची भूमिका आहे. प्रत्येक राज्यात एक दलीत मते निर्णाय ठरत असतात. (हेही वाचा, Left parties in Bihar: कन्हैय्या कुमार यांची जादू, तेजस्वी यादव यांची खेळी कामी आली, बिहारमध्ये डाव्या पक्षांची मुसंडी)

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असलेला सीपीएम नेता कन्हैय्या कुमार जेव्हा काँग्रेस पक्षात सहभागी होईल तेव्हा अपेक्षीत आहे की, ते आपल्यासोबत काही इतरही डाव्या पक्षांना सोबत घेऊन जातील. जिग्नेश मेवाणी आणि कन्हैय्या कुमार हे काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची बातमी 2022 मध्ये होणाऱ्या 2024 लोकसभा निवडणुकीच्या आगोदर काँग्रेस तरुण चेहऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे दर्शवते. (हेही वाचा, Rahul Gandhi यांच्या वैष्णोदेवी यात्रेनंतर BJP ने केले परिसराचे शुद्धीकरण; यात्रा ट्रॅकवर शिंपडले गंगाजल)

काँग्रेस सूत्रांचे म्हणने असे की, कन्हैय्या कुमार आणि राहुल गांधी यांच्यात पाठिमागील दोन आठवड्यात दोन वेळा आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्याशी भेट घेऊन भविष्यातील भूमिकांवर चर्चा केली. कन्हैय्या कुमार यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुक बेगूसराय येथून लढली. मात्र भाजप नेते गिरिराज सिंह यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.