झारखंड: तरुणीने केले आपल्या भावाशी लग्न, संतप्त झालेल्या वडिलांनी मुलीवर केले अत्यंसंस्कार
Marriage Photo Credits: Pixabay.com

झारखंड मधील रामगढ येथे समाजाला लाजवेल अशा घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. येथील एका तरुणीने घरातून पळून आपल्याच चुलत्या भावाशी लग्न केले. परंतु या मुलीचे लग्न रांची मधील खेलगावात ठरले होते. मात्र लग्नापूर्वीच ती घरातून पळाल्याने घरात खळबळ उडाली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी मुलीचे जीवंतपणी अंतसंस्कार केले आहेत. स्मशानभुमीत वडिलांनी संपूर्ण विधींसह मुलीचा पुतळा बनवून तिला जाळले. या अंतिमसंस्कार नातेवाईकांनी सुद्धा उपस्थिती लावली होती.(उत्तर प्रदेश: मेहुण्याच्या लग्नात भरपुर सोने खरेदी केल्याने नाराज झालेल्या वहिनीसह तीन मुलांनी विष पिऊन संपवले आयुष्य)

तरुणीने पळून चुलत्याशी लग्न केल्याने गावात परिवारावराची बदनामी झाली. तर मुलीच्या वडिलांनी असे म्हटले आहे की, तिच्या या वागण्यामुळे आमचे समाजात नाक कापले गेले आहे. कोणाला तोंड दाखवण्यास तिने आम्हाला सोडले नाही. तर तरुणीचे चुलत्यावर प्रेम होते त्यामुळेच त्यांनी लग्न केले. पोलिसांनी या दोघांना शोधून काढले आणि मुलीचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी तिने आम्ही लग्न केले असून प्रियकरासोबतच राहणार असल्याचे म्हटले आहे.(Online Frauds: धक्कादायक! ऑनलाइन पिझ्झा मागविला अन् अकाऊंटमधील 4 लाख रुपये झाले गायब)

तर मुलीच्या नातेवाईकांनी तिला खुप समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती आपल्या मतावर ठाम होती आणि लग्न झालेल्या मुलासोबतच राहणार असे तिने स्पष्ट केले. त्यामुळे मुलगी आपले ऐकत नाही हे दिसल्याने नाराज आणि संतप्त झालेल्या वडिलांनी स्मशानभूमीत तिच्यावर जीवंतपणी तिचा पुतळा जाळून अंतिमसंस्कार केले.