
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) देवरिया येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका महिलेने आपल्या तीन मुलांसह विष पिऊन आपले आयुष्य संपवले आहे. यामागील कारण होते की, तिच्या सासरच्या मंडळींनी मेहुण्याच्या लग्नासाठी अधिक दागिने खरेदी केल्याने ती नाराज झाली होती. याच कारणावरुन तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती दिली गेली आहे.(Uttar Pradesh: 27 वर्षांपूर्वी झाला बलात्कार; मुलाने वडिलांचे नाव विचारल्यावर महिलेने दोघांविरुद्ध दाखल केली तक्रार)
महिलेने रात्री घरातल्यांना जेवण दिल्यानंतर आपल्या मुलांसह ती रुममध्ये झोपण्यासाठी गेली. त्याचवेळी तिने मुलांसह किटकनाशक घेत आत्महत्या केली. यामुळे मुलांची तब्येत बिघडली असता ती मुले आरडाओरड करु लागली. त्यावेळी घरातील मंडळी जागी होत त्यांनी तो सर्व प्रकार पाहिला. त्याचवेळी घरातल्यांनी त्यांना रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यासाठी नेले. पण महिला आणि एका मुलाचा रस्त्यातच मृत्यू झाला. तर अन्य दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.(उत्तराखंड: मोबाईलवरील ऑनलाईन गेम टास्क पूर्ण करण्यासाठी 17 वर्षीय मुलाकडून रस्त्यातच महिलेवर चाकू हल्ला, आरोपी फरार)
या प्रकरणी सासूने म्हटले की, मेहुण्याच्या लग्नासाठी आम्ही एक दागिना अधिक खरेदी केल्याने ती नाराज झाली होती. त्यावेळी तिला सांगितले की लग्न झाल्यानंतर तुला सुद्धा दागिने घेऊन देऊ. पण तरीही ती नाराज होती. पोलिसांकडून या प्रकरणी पंचनामा करण्यात आला असून विविध कारवाई केली जात आहे.