जम्मू कश्मीर: पुलवामा मध्ये Tiken परिसरात 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाचं सर्च ऑपरेशन सुरू
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

जम्मू कश्मीर मधील पुलवामा (Pulwama) भागामध्ये आज पुन्हा दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे कर्मचारी यांच्यामध्ये चकमक सुरू झाली आहे. दरम्यान ANI च्या माहितीनुसार, 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांना यश आलं आहे. सध्या पुलवामाच्या टिकेन (Tiken area) भागामध्ये हे दहशतवादी आढळले असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. पुलवामामध्ये कश्मीर पोलिस आणि सुरक्षा दलाचे कर्मचारी एकत्रपणे दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. अजून 1 दहशतवादी लपला असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. दरम्यान हे दहशतवादी कोणत्या संघटनेशी निगडीत आहेत याचा देखील खुलास अद्याप करण्यात आलेला नाही.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांकडून सुरक्षा जवानांवर फायरिंग करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर सुरक्षा जवानांनीदेखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. या चकमकीमध्ये भारतीय सुरक्षा जवानांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. Delhi Police Special Cell कडून दहशतवादी संघटनेशी संबंधित 5 जणांना अटक; हत्यारं जप्त.

ANI Tweet

कश्मीर मध्ये सध्या डीडीसी मतदानाचे विविध टप्पे (District Development Council) सुरू आहे. कश्मीरच्या खोर्‍यामध्ये मतदानाचे टप्पे पार पडत असताना पहिल्यांदा अशाप्रकारे चकमक झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान सुरक्षा दलाला देखील अशाप्रकारच्या हल्ल्याची भीती होती. त्यामुळे अघटीत घटना टाळण्यासाठी मागील चारही टप्प्यांच्या मतदानाच्या वेळेस दक्षिण कश्मीर मध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान आहे. यापार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली आहे.