Delhi Police Special Cell कडून दहशतवादी संघटनेशी संबंधित 5 जणांना अटक; हत्यारं जप्त
दिल्ली पोलिस स्पेशल सेल (Delhi Police Special Cell) कडून आज (7 डिसेंबर) सकाळी दहशतवादी संघटनेशी निगडीत 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिस स्पेशल सेल (Delhi Police Special Cell) कडून आज (7 डिसेंबर) सकाळी दहशतवादी संघटनेशी निगडीत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या शकरपूर (Shakarpur) भागात झालेल्या चकमकीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 2 जण पंजाब (Punjab) तर 3 जण कश्मीरचे (Kashmir) असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ANI Tweets नुसार, दिल्लीच्या शकरपूर भागात झालेल्या चकमकीनंतर स्पेशल सेलने कारवाई केली आहे. यामध्ये ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांकडून हत्यारं जप्त करण्यात आली आहे अशी माहिती स्पेशल सेल डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी दिली आहे. नार्को टेरिझमसाठी या समुहाचा ISI ला पाठिंबा होता. आतंकवादी संघटनेच्या नावाची अद्याप खात्री होणं बाकी असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
ANI Tweet
#UPDATE The group was backed by ISI for Narcoterrorism. The name of the terror organisation is yet to be confirmed: Delhi Police https://t.co/SVW6S4kkp0
— ANI (@ANI) December 7, 2020
मीडीया रिपोर्ट्सनुसार पूर्व दिल्ली भागातून लक्ष्मी नगर, शकरपूर भागात स्पेशल सेल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली यामध्ये दोघांकडूनही फायरिंग झाले असून एकूण 13 राऊंड झाडण्यात आले आहेत. दरम्यान याप्रकरणी स्पेशल सेल अधिक तपास करत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2020 10:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

