भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) यांनी स्पष्ट केले आहे की, कोविड19 ची लस घेतल्यानंतर जर आरोग्यासंबंधिक कोणतीही समस्या आल्यास आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यास याचा खर्च आरोग्य विमा कंपन्याना द्यावा लागणार आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडे आरोग्य विमा असेल तर त्याने लस घेतल्यानंतकर एखाद्या कारणामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यास त्याचा रुग्णालयाचा खर्च किंवा कॅशलेस सुविधा देण्यास विमा कंपनी मनाई करु शकत नाही.(Coronavirus in India: भारतात कोरोना व्हायरस उद्रेक, गेल्या 24 तासात सुमारे 39,726 जणांना संसर्ग)
IRDAI यांनी गुरुवारी एका विधानात असे म्हटले आहे की, मीडियात अशी खबर पसरली आहे की कोरोनाची लस घेतल्यानंतर प्रकृती बिघडते. अशामुळे रुग्णालयात भरती होण्याची वेळ येत आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेताना विमा उपयोगी पडणार की नाही असा सुद्धा प्रश्न उपस्थितीत नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे स्पष्ट करण्यात येत आहे की, कोरोनाच्या लसीकरणानंतर जर प्रकृती बिघडल्यास आणि रुग्णालयात उपचारासाठी भरती झाल्यानंतर रुग्णाचा खर्च विमा पॉलिसी कंपनीला करावा लागणार आहे. मात्र यासाठी विमा कंपन्यांनी जे नियम आणि अटी लागू केले आहेत त्यांचे पालन करावे लागणार आहे.(Coronavirus in India: भारतातील कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसह राज्यांच्या प्रमुखांना दिला 'हा' सल्ला)
परंतु काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी विमा कंपन्यांसमोर असा प्रश्न उपस्थितीत केला आहे की,कोरोनाची लस घेतल्यानंतर रुग्णालयात भरती झाल्यस त्याचा खर्च विमा कंपनी करणार का? तर विमा कंपनीच्या नियम आणि अटींनुसार ग्राहकांना क्लेम करता येणार आहे. दुसऱ्या बाजूला विमा कंपनी एआयसी ने कोविड संकटामुळे झगडत असलेल्या आपल्या ग्राहकांना सेटलमेंटची प्रक्रिया अगदी सोपी केली आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, ग्राहक आपल्या पॉलिसीची मॅच्युरिटीच्या कालावधी संबंधित कागदपत्र देशातील कोणत्याही एलआयसी कार्यालयात जाऊन जमा करता येणार आहे.