
भारतामध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus in India) संक्रमणाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग होऊन 1,59,370 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आजघडीला 2,71,282 कोरोना (COVID 19) रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 1,10,83,679 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रालयाने लसीकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, देशात आतापर्यंत 3,93,39,817 नागरिकांना लस देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (19 मार्च) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या सातत्यान वाढत आहे. देशात आतापर्यंत 2,71,282 कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. देशातील कोरोना संक्रमणाचा सरकासरी दर 2.36% इतका आहे. उपचार घेऊन बरे होण्याचा दरही 96.26 % इतका आहे. (हेही वाचा, Coronavirus In Pune: कोरोना, लॉकडाऊन यांबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश)
शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार देशात आज 39,72 कोरोना रुग्णांची नोंद झाली. पाठीमागील 110 दिवसांतील ही सर्वात मोठी संख्या आहे. गेल्या 24 तासात 154 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या कोरोना संक्रमितांची संख्या 1,59,370 इतकी झाली आहे.
India reports 39,726 new COVID19 cases, 20,654 recoveries and 154 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,15,14,331
Total recoveries: 1,10,83,679
Active cases: 2,71,282
Death toll: 1,59,370
Total vaccination: 3,93,39,817 pic.twitter.com/tiVP1V9UZs
— ANI (@ANI) March 19, 2021
जागतिक महामारीत 28 सप्टेंबर पर्यंत 60 लाख, 11 ऑक्टोबर पर्यंत 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख, 20 नोव्हेंबरला 90 लाख आणि 19 डिसेंबरपर्यंत एक लाख कोटीचा आकडा पार केला. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने दिलेल्या आकडेवारीनुसार 18 मार्चपर्यंत 23,13,70,546 नमुने तपासले आहेत.