पुणे (Pune) जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वढते आहे. काल (गुरुवार, 18 मार्च) एका दिवसात तब्बल 4,965 कोरना (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली. तर कोरोना बाधीत 31 जणांचा मृत्यू झाला. कोरोना संक्रमितांची वाढती संख्या रोखण्याचे मोठे आव्हान शासन, प्रशासनासमोर आहे. असे असताना काही मंडळी पूर्ण माहिती नसताना किंवा काही माहितीच नसतानाही कोरोना, लॉकडाऊन (Lockdown) यांबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहेत. त्यामुळे समाजात अफवा पसरत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे जर कोणी कोरोना, लॉकडाऊन आदींबाबत अफवा पसरवल्याचे पुढे आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
पुण्यातील कोरोना स्थिती
पुणे जिल्ह्यात काल (गुरुवार) 4,965 रुग्ण आढळून आले. 31 जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 35,539 इतकी झाली आहे. काल सापडलेल्या एकूण (4,965) कोरना रुग्णांपैकी 2,791 रुग्ण हे पुणे महापालिका हद्दीतील आहेत. उर्वरीत 910 रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत. (हेही वाचा, कोविड-19 रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक; लसीकरणासंदर्भात दिले 'हे' निर्देश)
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांसी संख्या पाहून अनेक अफवा पसरवल्या जात आहे. यात लॉकडाऊन, लसीकरण आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. अफवांमुळे होणारी नागरिकांची दिशाभूल थांबविण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. यापुढे अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.