फोटो पाठवले नाहीस तर हाताची नस कापण्याची इन्स्टाग्रामवरील मित्राकडून धमकी, १७ वर्षीय मुलीला न्यूड फोटो पाठवण्यासाठी केले ब्लॅकमेल
Photo Credit: Pixabay

कर्नाटकच्या बंगळुरुमधील एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून 17 वर्षांच्या मुलीशी एका व्यक्तीने मैत्री केली आणि तिला न्यूड फोटोसाठी ब्लॅकमेल केले गेल्याची ही तक्रार आहे.बंगळुरुमधील अग्रहरा दशरहल्ली परिसरातील गृहिणी असलेल्या या महिलेचा आरोप आहे की, तिची अल्पवयीन मुलगी गेल्या महिन्यात इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कार्तिक नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती.त्यानंतर कार्तिकने आपल्या मुलीला अश्लील गोष्टी (pornographic content) पाठवण्यास सुरुवात केले आणि नंतर तिने त्याला न्यूड फोटो (intimate photographs) पाठवावे अशी मागणी तो करू लागला. ('Skin to Skin' Contact: NCW च्या Bombay High Court च्या निर्णया विरूद्ध याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणीला परवानगी; महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवत मागवला अहवाल )

सुरुवातीला त्या 17 वर्षीय मुलीने त्याला काहीच उत्तर दिले नाही त्यानंतर कार्तिकने तिला भावनिकपणे ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. ''जर तिने न्यूड फोटो पाठवले नाही तर तो त्याची नस कापेल'' असे बोलून तो तिला ब्लॅकमेल करू लागला. त्याच्या अशा बोलण्याने ती मुलगी घबरली आणि तिने तिचा फोटो त्याला पाठवले . टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नंतर तिच्या आईला याविषयी माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिसांकडे संपर्क साधला. त्याने तिला ''न्यूड फोटो पाठवले नाहीस तर नस कापेल अशी धमकी देण्यास सुरुवात केली. ती घाबरली आणि तिने आपले फोटो त्याच्याकडे पाठवले, ”असे तक्रारीत नमूद केलेल्या अहवालात म्हटले आहे.

पोलिसांनी कार्तिकविरूद्ध कलम 67 अ अन्वये (लैंगिक सुस्पष्ट कृत्ये असलेले साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) आणि 67 बी (लैंगिक सुस्पष्ट कृत्य करणार्‍या मुलांना चित्रित करणारे साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.