INS Tushil (फोटो सौजन्य - X/@ReviewVayu)

INS Tushil: भारतीय नौदल 9 डिसेंबर रोजी रशियातील कॅलिनिनग्राड (Kaliningrad) येथे आपले नवीनतम मल्टी-रोल स्टेल्थ गाईडेड मिसाईल फ्रिगेट, INS तुशील (INS Tushil) कार्यान्वित करण्यासाठी सज्ज आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) प्रमुख पाहुणे म्हणून या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उच्चस्तरीय भारत-रशिया सरकारमधील संरक्षण अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

INS तुशीलची खासियत -

INS तुशील हे प्रोजेक्ट 1135.6 चे अपग्रेडेड क्रिवाक III श्रेणीचे फ्रिगेट आहे. यापैकी सहा आधीच सेवेत आहेत, ज्यात तीन तलवार-श्रेणी जहाजे, सेंट पीटर्सबर्ग, बाल्टीस्की शिपयार्ड येथे बांधली गेली आहेत आणि तीन फॉलो-ऑन टेग-क्लास जहाजे, यांतार शिपयार्ड, कॅलिनिनग्राड येथे बांधली गेली आहेत. INS तुशील हे या श्रेणीतील सातवे आणि दोन प्रगत अतिरिक्त फॉलो-ऑन जहाजांपैकी पहिले आहे. यासाठी JSC Rosoboronexport, भारतीय नौदल आणि भारत सरकार यांच्यात ऑक्टोबर 2016 मध्ये करार करण्यात आला. (हेही वाचा - Rajnath Singh: 'अनपेक्षित संघर्षांसाठी तयार राहा'; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे वरिष्ठ नौदलाच्या अधिकार्‍यांना आवाहन)

आयएनएस तुशील 'या' शस्त्रांनी सुसज्ज -

या युद्धनौकेची लांबी 409.5 फूट, बीम 49.10 फूट आणि ड्राफ्ट 13.9 फूट आहे. समुद्रात ते ताशी 59 किमी वेगाने धावू शकते. 18 अधिकाऱ्यांसह 180 सैनिकांना घेऊन ते 30 दिवस समुद्रात राहू शकते. INS तुशील इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीने सुसज्ज आहे. हे 4 KT-216 decoy लाँचरने सुसज्ज आहे. यात 100 मिमी ए-190ई नेव्हल गनही बसवण्यात आली आहे. (हेही वाचा -भारतात आलेला एकही दहशतवादी पाकिस्तानात जाऊ शकणार नाही- राजनाथ सिंह)

याशिवाय, या युद्धनौकेत एक 76 मिमी ओटो मेलारा नौदल तोफा आणि 2 AK-630 CIWS आणि 2 Kashtan CIWS तोफा आहेत. या धोकादायक तोफांशिवाय ही युद्धनौका दोन 533 मिमी टॉर्पेडो ट्यूबने सुसज्ज आहे. त्यात रॉकेट लाँचरही तैनात करण्यात आले आहे. याशिवाय हे जहाज कामोव-28 किंवा कामोव्ह-31 किंवा ध्रुव हेलिकॉप्टरने सुसज्ज आहे.