Sonam Raghuvanshi ‘Arrested’ (Photo Credits: X/@SachinGupta)

शिलॉंगला हनिमूनसाठी गेलेली तरूणी 16 दिवसांनंतर उत्तर प्रदेश मध्ये गाझिपूर भागात रविवार 8 जून दिवशी दिसली आहे. सध्या पोलिसांनी तिला अटक केली आहे. पतीच्या मर्डरच्या संशयातून तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तिची सध्या चौकशी सुरू आहे. मेघालय पोलिसांच्या दाव्यानुसार सोनम ने पती राजा रघुवंशी याचा खूनाचा कट रचला असावा. राजा चा मृतदेह काही दिवसांपूर्वी एका निर्जन ठिकाणी आढळला होता. मूळचे इंदौरचे हे जोडपे हनिमून साठी गेले असता अचानक गायब झाले होते.

रिपोर्ट्सनुसार, पोलिसांचा दावा आहे की सोनम ने कॉन्ट्रॅक्ट किलर्सच्या मदतीने आधीच पतीचा खून आखला होता.सोनम सोबत हॉटेल मध्ये असलेले 2 अन्य पुरूष देखील पोलिसांच्या अटकेमध्ये आहेत.

दरम्यान, सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी यांनी पोलिसांचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी त्यांची मुलगी निर्दोष असल्याचं म्हटलं आहे आणि घाईघाईने सांगितलेल्या कथनासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना दोषी ठरवले आहे. सोनम बेपत्ता झाल्यानंतरचा तिचा पहिला फोटो आता ऑनलाइन समोर आला आहे.

Sonam Raghuvanshi ची समोर आली अवस्था

लग्न, हनिमून, हत्या

11 मे 2025 दिवशी लग्नानंतर राजा आणि सोनम शिलॉंगला हनिमूनला गेले. 20 मे दिवशी ते शिलॉंगला पोहचले आणि 23 मे दिवशी त्यांचा कुटुंबाशी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर दोघांचाही फोन बंद होता. त्यांची भाड्याने घेतलेली अॅक्टिवा स्कूटी सोहरारीममध्ये सोडून देण्यात आली. 2 जून रोजी राजाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह वेई सोडोंग धबधब्याजवळील एका खोल दरीत आढळला, त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. परंतु सोनमचा कोणताही पत्ता लागला नाही, ज्यामुळे कुटुंबाला अपहरण आणि तस्करीचा संशय येऊ लागला.

सोनम रघुवंशी ही 24 वर्षांची आहे. वाराणसी-गाझीपूर मुख्य रस्त्यावरील काशी ढाब्यावर आढळली. तिला प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आणि नंतर तिला गाझीपूरमधील वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती एडीजी कायदा आणि सुव्यवस्था, उत्तर प्रदेश, अमिताभ यश यांनी दिली आहे.