लस घेतलेल्या नागरिकांना Indigo कडून दिला जातोय 10 टक्के डिस्काउंट, जाणून घ्या ऑफरबद्दल अधिक
IndiGo Aircraft | Representational Image (Photo Credits: ANI)

सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहताना मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण पार पाडले जात आहे, अशातच आता इंडिगो (Indigo) कडून विमानाने प्रवा करणाऱ्यासाठी तिकिटांवर 10 टक्के सूट दिली जाणार आहे असे स्पष्ट केले आहे. मात्र त्यासाठी तुम्ही लस घेणे अनिवार्य आहे. सरकारच्या नेतृत्वाखालील सामुहिक लसीकरण मोहिमेला समर्थन देणे आणि जबाबदार नागरिकांना विमान प्रवासासाठी प्रोत्साहान करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.(Gold Rate Today: MCX वर आज सोन्याचा दर मागील 2 महिन्यातील निच्चांकी; पहा सोने, चांदीचा भाव काय?)

एअरलाइन्सने एका विधानात असे म्हटले की, इंडिगो कडून दिले जाणारे डिस्काउंट हे फक्त 18 वर्षावरील सर्व प्रवाशांना मिळणार आहे. तर जे बुकिंगच्या वेळी भारतात आहेत आणि देशातच कोविडची लस घेतली आहे त्यांना याचा फायदा होणार आहे. भारतात सरकारने आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेले कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहहे. ऑप्शनसाठी प्रवाशांना विमानतळावर चेक-इन काउंटर/ बोर्डिंग गेटवर आरोग्य सेतु मोबाईल अॅपवरील लसीकरणासंबंधित स्टेट्स दाखवता येणार आहे.

संजय कुमार मुख्य रणनिती आणि राजस्व अधिकारी यांनी असे म्हटले की, देशातील सर्वाधिक मोठी एअरलाइन्स असल्याने आम्हाला वाटते राष्ट्रीय लसीकरण अभियानात योगदान देणे आमची जबाबदारी आहे. यासाठी अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव फक्त त्यांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याससह ते यात्रा सुद्धा करु शकतात यासाठी आहे. एअरलाइन्सकडून या ऑफरच्या अंतर्गत फक्त लिमिटेड इन्वेंट्री सुरु केली आहे. त्यामुळे ही ऑफर कोणत्याही अन्य ऑफर, स्किम किंवा प्रमोशनसोबत जोडता येणार नाही आहे. ती फक्त इंडिगोच्या वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे.