Jewellery (Photo Credits: Pixabay)

मागील काही दिवसांतील आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील घडामोडी भारतामध्ये सोन्या, चांदींच्या दरावर देखील परिणाम करत आहेत. आज (23 जून) दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेत सोन्याचा दर हा जवळपास मागील दोन महिन्यांतील निच्चांकी दर नोंदवण्यात आला आहे. सोनं दहा ग्राम साठी ₹47,000 आणि चांदी 0.46% ने वाढून प्रति किलो ₹67,823 इतकी नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पॉट गोल्डची किंमत 0.1 टक्क्यांनी वाढून प्रति औंस 1,780.06 डॉलर्स इतकी झाली आहे.

IBJA च्या माहितीनुसार, आज रिटेल मध्ये जीएसटी वगळता 24 कॅरेट सोन्याचा सेलिंग रेट 47,225 प्रति तोळा आहे. 23 कॅरेटचा 47036 प्रति तोळा आहे आणि 22 कॅरेटचा 43,258 रूपये प्रति तोळा आहे. तर चांदीचा दर प्रति किलो 67,924 रूपये इतका आहे. नक्की वाचा:  मुंबई, सातारा ते अमरावती 16 जून पासून 256 जिल्ह्यात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य; इथे पहा संपूर्ण यादी .

IBJA चं ट्वीट

Good Returns च्या माहितीनुसार, आजचा 10 ग्राम सोन्याचा दर 47,150 रूपये आहे तर 22 कॅरेट साठी ₹46,150 आहे. दरम्यान भारतामध्ये प्रत्येक शहरानुसार, सोन्या-चांदीचे दर वेगवेगळे असतात.

अमेरिकेच्या फेडरल रिजर्व्ह चे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्याकडून व्याज दरांमध्ये तातडीने वाढ न करण्याचा निर्णय झाल्याने आता पॉझिटीव्ह ग्लोबल संकेतांमुळे भारतामध्येही सोन्याच्या किंमतींमध्ये आज वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे.