इंडिगो | प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: ANI)

भारतातील सर्वात मोठी विमानसेवा कंपनी इंडिगो (IndiGo) यांनी सॅलरी कपातीचा निर्णय मागे घेतला आहे. कारण सरकारने कोरोनाची देशातील एकूणच परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांवर काढून टाकू नये किंवा त्यांच्या वेतनात कपात करु नये असे आवाहन केल्यानंतर त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. देशभरातील विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय कंपनीने मार्च महिन्यात घेतला होता. परंतु तो आता मागे घेतल्याचे स्पष्ट केले आहे. तर कंपनीच्या कार्यकारी समितीचे सदस्य आणि वरिष्ठ उपाध्यक्षांनी स्वत:हून या महिन्याचा पगार कमी घेणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाउनचे आदेश दिल्यानंतर सरकारने कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय करु नका असे स्पष्ट केले होते. तसेच त्यांचा पगार सुद्धा पूर्णपणे द्यावा असे आवाहन ही केले होते. परंतु कंपनीने यापूर्वी एप्रिल महिन्याचा पगार कापणार असल्याचा निर्णय घेतला होता. तो आता कपात करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी 19 मार्चला कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे एअरलाईन्सचे वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात येणार आणि त्यांनी स्वत:हून 25 टक्के कमी पगार घेणार असल्याचे म्हटले होते. तर एसपीवी आणि त्यांच्यावरील अधिकारी 20 टक्के, वीपी आणि कॉकपिटचे सदस्य 15 टक्के कमी पगार घेणार आहेत. इंडिगो एअरलाईन्सचे भारतात 47 टक्के मार्केट शेअर आहे.(IndiGo Airlines लॉकडाऊन संपल्यानंतर पुढील काही दिवस प्रवाशांना नाही देणार 'या' सुविधा)

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. त्यामुळे देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे विमान उद्योगाला याचा फटका बसला आहे. तसेच नागरिकांना 25 मार्च ते 14 एप्रिल मध्ये तिकिट बुकिंग करुन 25 मार्च ते 3 मे दरम्यान प्रवासाचा निर्णय घेतला होता त्यांना रिफंड 3 आठवड्यात  देण्यात येणार आहे.  तर देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 21393 वर पोहचला आहे.