IndiGo Aircraft | Representational Image (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी भारतामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 14 एप्रिल पर्यंतच्या या लॉकडाऊनमध्ये सध्या देशांर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवादेखील स्थगित करण्यात आली आहे. भारतामध्ये 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन राहणार का? याबाबत सराकारकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही मात्र IndiGo Airline ने आपला लॉकडाऊननंतरचा प्लॅन जाहीर केला आहे. इंडिगो चे सीईओ Ronojoy Dutta यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन नंतर पुन्हा विमानसेवा सुरू करताना फ्लाईटमध्ये प्रवाशांना जेवण दिले जाणार नाही. आत्तापर्यंत कंपनी safety conscious होती परंतू आता आपल्याला health conscious होणं गरजेचे आहे. विमानतळावर देखील प्रवासी विमानसेवा सुरू झाल्यानंतर ये-जा करणार्‍या एअरपोर्ट बसमध्येही 50% आसणक्षमता वापरली जाईल. त्यामुळे social distancing पाळायला मदत होईल. SpiceJet कडून Happy At Home Sale ची घोषणा; 939 रूपयांंत विमान प्रवास सोबत रिशेड्युलची मुभा! जाणून घ्या काही खास ऑफर्स

इंडिगोच्या सीईओकडून एका ईमेलच्या माध्यमातून त्यांच्या कर्मचार्‍यांना आज माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, 'सध्याच्या स्थितीमध्ये कंपनी नफा मिळवण्याच्या प्लॅनपेक्षा पैसा खेळता कसा राहील यासाठी प्रयत्न करत आहे. वायफळ खर्च कमी करून सेवा कशी सुरू ठेवता येईल यासाठी सध्या आपण प्रयत्न करत आहोत.' असे देखील सांगण्यात आले आहे.

PTI च्या रिपोर्ट्सनुसार, इंडिगोचा लॉकडाऊननंतरचा प्लॅन हा सेवा सुरू करण्यासाठी असेल. हळूहळू त्याच्यामध्ये वाढ केली जाईल. दरम्यान आता विमानं अधिक काळजीपूर्वक आणि वारंवार स्वच्छ केली जातील. मात्र लवकरच नवी नियमावलीदेखील जाहीर केली जाईल त्यानुसार आपली सेवा पुन्हा पूर्ववत करण्यास मदत होईल.