Spicejet | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

भारतीय सध्या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. सध्या देशात रेल्वे, रस्ते यांच्यासोबतच देशांर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहे. भारतामध्ये दिवसगणिक वाढणारा कोरोनाबधितांचा आकडा पाहता आता हा लॉकडाऊनचा काळदेखील वाढवला जाणार का? याबाबत अद्याप कोणाताही ठोस निर्णय झालेला नाही. मात्र SpiceJet या विमानसेवा कंपनीने Happy At Home Sale जाहीर केला आहे. स्पाईसजेटच्या ट्वीटर हॅन्डलवर दिलेल्या माहितीनुसार आता प्रवाशांना 939 रूपयांपासून तिकीटं बुकं करता येणार आहेत आणि ती रिशेड्युल करण्याचीदेखील मुभा मिळणार आहे. दरम्यान या तिकीट खरेदीवर 25 ते 30% सूट साठी खास ऑफर्सदेखील देण्यात आल्या आहेत. Coronavirus: Lockdown संपणार की वाढणार? 14 एप्रिल नंतर सरकारचा विचार काय?

स्पाईसजेटचा हा Happy At Home Sale अंतर्गत खास तिकीट बुकिंग 12 एप्रिल 2020 पर्यंत करणं गरजेचे आहे. तर या काळामध्ये 28 फेब्रुवारी 2021 पर्यंतची तिकीटं बुक करता येऊ शकतात. सध्या स्पाईसजेटकडून 31 मे 2020 पर्यंतची तिकीटं एक वेळसाठी पुढे ढकलण्याची मोफत मुभा देण्यात आली आहे. ही तिकीटं 30 सप्टेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलली जाऊ शकतात. मात्र त्यानंतरच्या तारखांचं तिकीट बुकिंग करायचं असेल तर प्रवाशांना आता खास दरात तिकीटं उपलब्ध करून दिली जात आहे.

महाराष्ट्रात संचारबंदीसह लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. याकाळात सध्या देशांर्तगत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. 15 एप्रिलपासून विमानसेवा पुन्हा सुरू होणार का? याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.