Monsoon 2019: यंदा देशात मान्सून (Monsoon) काहीसा कमजोर दिसत आहे. देशात यंदाचा पावसाळा सुरु होऊन साधारण पाच आठवडे झाले. मात्र, या पाच आठवड्यात पाऊस तुलनेत अगदीच कमी राहिला. हवामान विभागाचा एक अहवाल 3 जुलै रोजी प्रसिद्ध झाला. या अहवालात म्हटले आहे की, या वेळी मध्य आणि पश्चिम भारतात पाऊस चांगला राहिला. मात्र, देशातील उर्वरीत प्रदेशात मात्र पावसाचा सरासरी आकडा हा 28 % पेक्षाही कमी राहिला आहे. जून महिन्याची सुरुवात ते 3 जुलै या दरम्यान गेल्या 50 वर्षांतील 6 % कमी पावसाची नोंद झाली आहे.
पाऊस कमी प्रमाणात आल्याने त्याचा विपरीत परिणाम हा पिकांच्या लागवडीवर आणि उत्पन्नावर होऊ शकतो. भारत हा अशिया खंडातील सर्वा मोठी तीसरी अर्थव्यवस्था आहे. यात कृषी क्षेत्राची भूमिका 15 % इतकी आहे. ज्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. आतापर्यंत देशात पावसाच्या माध्यमातून मध्य भारतात 43 % अधिक पाणी पडले आहे. जे सोयाबिन आणि कापसासाठी फायदेशिर ठरु शकते. दरम्यान, रबर आणि चहा उत्पादक केरळ रज्यात 87% कमी पाऊस पडला आहे. (हेही वाचा, ILO Report 2019: सावधान! तुमची नोकरी धोक्यात आहे; 2030 पर्यंत संपणार 34 दशलक्ष जॉब)
दरम्यान, देशातील विविध राज्यांमध्ये मान्सून पोहोचला आहे. मात्र, काही राज्यांमध्ये तो पोहोचायचा आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार 5 ते 6 जुलैदरम्यान पाऊस राजधानी दिल्लीत दाखल होईल. येत्या 48 तासात मान्सून मध्य प्रदेश,गुजरात, उत्तराखंड, उत्तराखंड, हरियाणा आणि दिल्ली आदी राज्यांमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो.