Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या अपडेट्नुसार, मागील 24 तासांत 83,341 नवे रुग्ण आढळले असून 1096 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांच्या (COVID-19 Positive) एकूण संख्येने 39 लाखांचा आकडा पार केला असून एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 39 लाख 36 हजार 748 वर गेली आहे. तर मृतांची एकूण संख्या 68,472 वर पोहोचली आहे. देशात कोरोनाने हाहाकार माजविला असून ही आकडेवारी देशातील कोरोनाची गंभीर स्थिती दर्शवित आहे. देशात सद्य घडीला 8 लाख 31 हजार 124 रुग्ण आढळले असून आतापर्यंत 30 लाख 37 हजार 152 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

देशात दिवसागणिक वाढत जाणा-या कोरोना रुग्णांच्या संख्येने 80,000 चा आकडा पार केला आहे जे देशाची चिंतेची बाब आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. Coronavirus: महाराष्ट्रात दिवसभरात 18,105 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग, 391 जणांचा मृत्यू

दरम्यान अमेरिकेमध्ये Novavax च्या कोविड 19 वरील संभाव्य लसीचे परिणाम सुरूवातीच्या टप्प्यातील परिणाम समाधान असल्याची माहिती समोर येत आहे. NVX-CoV2373, या लसीमध्ये SARS-CoV-2 या कोविड 19 ची लागण करणार्‍या व्हायरसचे जेनेटिक सिक्वेन्स सोबत इंजिनियरिंग करून लस बनवण्यात आली आहे. दरम्यान शरीरात अ‍ॅन्टिबॉडीज तयार करण्यासाठी, संसर्गाचा सामना करण्यासाठी कोरोना व्हायरसच्या प्रोटीन्सचा समावेश करण्यात आला आहे.