Coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकार लॉकडाऊन (Lockdown) शिथील करत आहे. त्यानुसार 1 सप्टेंबरासून राज्यात अनलॉक 4 (Maharashtra Unlock 4) सुरु झाला. हळूहळू सर्व सुरळीत सुरु करणयाचा प्रयत्न असतानाच राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने (aharashtra Health Department) दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात महाराष्ट्रात 18,105 जण कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित आढळले. तर 391 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, राज्यात आज दिवसभरात 13,988 रुग्णांना डिस्चार्ज दण्यात आला. राज्यात आतापर्यंत उपचारानंतर पूर्ण बरे (Recovery) होऊन डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 6,12,484 इतकी आहे. तर राज्याचा रिकवरी रेट 72.58% इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 3.03% वर पोहोचला आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रात धार्मिक स्थळ का उघडली जात नाहीत? राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली भूमिका)

राज्यात आतापर्यंत 43,72,697 इतके नागरिकांचे नमुणे कोरोना चाचणीसाठी तपासण्यात आले. त्यापैकी 8,43,844 जण कोरोना पॉझिटीव्ह आले. राज्यातील कोरोना पॉझिटीवर रुग्णांची सरासरी टक्केवारी 19.29% इतकी आली. दुसऱ्या बाजूला राज्यात होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 14,27,316 इतकी आहे. तर, संस्थांत्म क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 36,745 इतकी आहे.

राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या 8,43,844 इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन बरे झालेल्या आणि त्यामुळे रुग्णालयांतून सुट्टी (डिस्चार्ज) मिळालेल्या 6,12,484 जणांचा समावेश आहे. त्यासोबतच प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 2,05,428 रुग्णांचा आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 25,586 रुग्णांचाही एकूण संख्येत (8,43,844) समावेश आहे.