महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. परिणामी, राज्यातील अनेक उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. मात्र, राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊनच्या निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी अनलॉक होत आहे. परंतु, अद्यापही राज्यातील मंदिर गेल्या पाच महिन्यांपासून बंदच आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ सुरु करण्याबाबत विरोधकांकडून सातत्याने मागणी होत आहे. यावर यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नुकतेच उद्धव ठाकरे यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर येथीळ कोविड उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर मंदिराबाबत भाष्य केले आहे. आपण अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरु केले आहेत. मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहेत. इतर देश फक्त कोविड एके कोविडचा मुकाबला करत आहेत. आपले तसे नाही. आपल्याकडे आता गणेशोत्सव, मोहरम पार पडला, आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पावसाला सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा आपल्यासाठी कसोटीचा काळ आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्र: राज्यात मंदिरे बंद ठेवण्याची सरकारची इच्छा नसून या संदर्भात संपूर्ण तयारीसह निर्णय घेतला जाईल- खासदार संजय राऊत
तसेच, कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी अद्याप सकारात्मक औषध बाजारात आले नाही. यामुळे राज्यातील नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. याशिवाय शरीरिक अंतर राखणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, या गोष्टींचे पालन करणे अतिशय गरजेचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. महत्वाचे म्हणजे, दरम्यान, धार्मिक स्थळ खुली करण्याबाबत मात्र त्यांनी थेट उत्तर दिले नाही. त्यामुळे राज्यात धार्मिक स्थळ केव्हा सुरू होणार? याबाबत कोणतेही विधान केले नाही.