महाराष्ट्र: राज्यात मंदिरे बंद ठेवण्याची सरकारची इच्छा नसून या संदर्भात संपूर्ण तयारीसह निर्णय घेतला जाईल- खासदार संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

देशभरासह महाराष्ट्रात अनलॉक-4 नुसार काही गोष्टी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामध्ये नागरिकांना आता ई-पासची गरज भासणार नाही आहे. तसेच राज्याअंतर्गत प्रवासाला सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्याप राज्यात जिम, सिनेमागृह, नाट्यगृह आणि धार्मिक स्थळांसह मंदिरे बंदच आहेत. याच दरम्यान आता मंदिरे सुरु करण्यासाठी नागरिकांकडून आंदोलने केली जात आहेत. परंतु यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Maharashtra Unlock 4: राज्यात ई-पास रद्द,राज्यांतर्गत रेल्वे प्रवास करण्यास मुभा, Railway Ticket Booking 2 सप्टेंबरपासून सुरु)

संजय राऊत यांनी असे म्हटले आहे की, सरकारला सुद्धा राज्यात मंदिरे बंद ठेवण्याची इच्छा नाही आहे. परंतु मंदिरे सुरु करण्यासंदर्भातील निर्णय हा संपूर्ण तयारीनिशी घेतला जाईलच. पण कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याचे ही लक्षात घ्यावे असे ही राउत यांनी स्पष्ट केले आहे.(Maharashtra Mission Begin Again वरून राज ठाकरे यांचा पुन्हा हल्लाबोल; सरकार मंदिर उघडण्याबाबत सकारात्मक नसेल तर आदेश झुगारून थेट प्रवेश करण्याचा दिला इशारा)

दरम्यान, राज्यातील प्रसिद्ध मंदिरांसह धार्मिक स्थळ मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर ते आतापर्यंत बंदच ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे जवळजवळ दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरीही मंदिरे बंद असल्याने तेथील दुकानदारांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांकडून सुद्धा सरकारने मंदिरे सुरु करावीत यासाठी आंदोलनांसह टीका केली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात काल  आणखी 17 हजार 433 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 292 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 8 लाखांच्या वर गेली आहे. यापैंकी 25 हजार 195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5 लाख 98 हजार 496 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.