Sikkim Accident (Photo Credit- Twitter/@tweet_sandeep)

भारतीय लष्कराच्या (Indian Army) 16 जवानांचे अपघाती निधन झाले आहे. उत्तर सिक्कीममध्ये (North Sikkim) लष्कराच्या ट्रकला अपघातात (Indian Army Truck Accident ) या जवानांना आपले प्राण गमवावे लागले अशी माहिती भारतीय लष्करीने दिली आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार, दुर्दैवी वाहन तीन वाहनांच्या ताफ्याचा भाग होता जो सकाळी चट्टेनहून थंगूच्या दिशेने जात होता. झेमा येथे जाताना, एका धोकादायक वळणावर प्रवास करताना वाहन तीव्र उतारावरून घसरले आणि अपघातघडला.

अपघाताची माहिती मिळताच लष्कराने मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु केली. ज्यामध्ये चार जखमी सैनिकांना दरीतून बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लष्काराच्या वाहनाला झालेल्या अपघातात तर तीन कनिष्ठ अधिकारी आणि 13 सैनिक या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा, Covid19 Guidelines To Indian Army: कोरोनाच्या पार्श्वभुमिवर भारतीय लष्कराकडून विशेष नियमावली जारी, जवानांना देखील मास्क आणि सोशल डिस्टंसिंग संबंधीत विशेष सुचना)

ट्विट

लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातात जवानांचे निधन झाल्याचे वृत्त कळताच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरद्वारे भावना व्यक्त केल्या. त्यांनी इंग्रजीत केलेल्या ट्विटचा मराठी भावार्थ असा की, उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या रस्ता अपघातात भारतीय लष्करातील जवानांच्या मृत्यूमुळे खूप दुःख झाले. त्यांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना. जखमी झालेल्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना.