प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: हाहाकार माजविला असून दिवसागणिक वाढत जाणा-या रुग्णांच्या संख्येत 10 हजारांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत भारतात COVID-19 चे 10,956 रुग्ण आढळले असून देशांत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,97,535 वर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत 396 रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा 8498 वर पोहोचला असल्याची अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे. भारतात सद्य घडीला 1,41,842 रुग्णावंर उपचार सुरु असून 1,47,195 रुग्णांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. देशात वाढत जाणारी कोरोना बाधितांची संख्या हा चिंताजनक विषय बनत चालल्याचे दिसून येत आहे.

भारतात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात असून राज्यात एकूण 97,648 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशातील कोरोना बाधितांचा आकडा मोठा असला आणि त्यात सातत्याने भर पडत असली तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही चांगली आहे. त्यामुळे भारताचा रिकव्हरी रेट 48.88% इतका आहे. Coronavirus बाबत भारताने ब्रिटनला टाकले मागे; बनला जगातील 4 थ्या क्रमांकाचा कोरोना विषाणू संक्रमित देश

कोरोना व्हायरसचा संसर्ग थोपवण्यासाठी 24 मार्चपासून लॉकडाऊनमध्ये असलेला देश जूनच्या पहिल्या आठवड्यापासून अनलॉक होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दरम्यान कोविड-19 चा धोका टळलेला नसल्याने सोशल डिस्टिसिंग पाळून इतर खबदारी घेणे आवश्यक आहे.