दिल्ली एम्सचे डिरेक्टर रणदीप गुलेरिया (AIIMS Director Dr Randeep Guleria) यांनी सध्या भारतामध्ये कोविड 19 लसीचा (COVID 19 Vaccine) नागरिकांना बुस्टर डोस आवश्यक नसल्याचं म्हटलं आहे. गुलेरिया यांच्या माहितीनुसार, सध्या देशात कोरोना वायरसच्या रूग्णांमध्ये फारशी वाढ होत नाही त्यामुळे कोविड 19 लसीचे डोस सध्या संरक्षण देण्यास समर्थ असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे बुस्टर डोसची गरज सध्या दिवसागणिक कमी होत आहे. सेरो पॉझिटिव्हिटी रेट देखील आता उच्चांकी आहे.
भारतामध्ये तिसर्या लाटेबद्दल रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती पहिल्या आणि दुसर्या लाटेच्या तुलनेत आता आली तरीही तिचा प्रभाव कमी असेल. हळूहळू त्याचं स्वरूप बदलेल. कोविडचे रूग्ण सापडत राहतील पण त्याची गंभीरता फार कमी असणार आहे. सध्या अधिकाधिक लोकांनी कोविड 19 चे दोन्ही डोस वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे. यामुळे आपल्याला संरक्षण मिळण्यास मदत होईल. सध्या परिस्थिती आशादायक असली तरीही नगारिकांनी पुरेशी काळजी घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. आता वाहतूक वेगवान झाल्याने व्हायरसचा प्रसार देखील त्याच वेगाने होण्याची शक्यता आहे.
डॉ. गुलेरिया हे 'Going Viral'या ICMR Director General Dr Balram Bhargava यांच्या कोवॅक्सिन निर्मितीच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी निती आयोगाचे डॉ. वी के पॉल यांनी बुस्टर डोस बाबत देशात अद्यापही संशोधन करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: देशातील नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस दिला जाणार? नीति आयोगाने दिले हे उत्तर .
भारतामध्ये आता हळूहळू कोरोना रूग्ण वाढीचा दर कमी होत आहे. मागील 2-3 दिवसांपासून देशात 24 तासांमध्ये 10 हजारांपेक्षाही कमी रूग्णसंख्या समोर येत असल्याने प्रशासनासोबतच आरोग्य व्यवस्थेलाही दिलासा मिळत आहे.
भारताने 2022 च्या शेवटापर्यंत संपूर्ण देशाला लसवंत करण्याचा मानस व्यक्त केला होता पण आता ती शक्यता कमी होत आहे. भारतामध्ये अद्यापही काही राज्यांत लस देण्याचा रेट कमी आहे. तसेच अनेकजण दुसर्या डोस साठी करत असलेली टाळाटाळ यामागील कारण असल्याचं सांगितलं जात आहे.