Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

देशात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सध्या लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. अशातच आता बूस्टर डोस (Booster Dose) संदर्भात ही जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नीति आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी असे म्हटले की, सरकार कडून अद्याप कोविड लसीच्या बूस्टर डोस बद्दल विचार केला जात नाही आहे. तसेच लसीकरणावर नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्युनाइजेशन यांच्याकडून सुद्धा कोणताही सिफारिश करण्यात आलेली नाही.

वीके पॉल यांनी टाइम्स ऑफ इंडिया यांच्यासोबत बातचीत करताना असे म्हटले की, बूस्टर शॉट्सच्या वेळेबद्दल सध्या खुप चर्चा आहे. विविध लसीचे वेगवेगळे शेड्युल असू शकतात. याबद्दल अत्यंत नाजूकपणे अभ्यास केला जात आहे. तर देशात वयोवृद्धांना लसीचे दोन्ही डोस देण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.(PF Nomination Update: पीएफ धारकांना पूर्ण फायदा मिळवण्यासाठी EPF/EPS Nomination Online करणं गरजेचं; पहा स्टेप बाय स्टेप ते कसं कराल?)

सीरम इंस्टिट्युटचे अध्यक्ष साइरस पूनावाला यांच्याकडून दुसरा डोसच्या 6 महिन्यानंतर कोविशील्ड लसची तिसरी किंवा बूस्टर डोसची आवश्यकतेवर जोर देण्याचवर पॉल यांनी म्हटले की, जगात अत्यंत कमी देशांनी बूस्टर डोसची सुरुवात केली आहे. त्यांनी पुढे असे ही म्हटले की, यासंदर्भात डब्लूएतओ कडून अद्याप कोणतीही सिफारीश आलेली नाही. या बद्दल त्यांनी म्हटले की, आम्ही या संबिधित आकडेवारीवर लक्ष ठेवून आहोत. तसेच एनटीएजी कडून  मार्गदर्शन केले जाणार आहे.

कोविशिल्डचे दोन डोस मधील अंतर कमी करण्याबद्दल पॉल यांनी असे म्हटले की, यावर एनटीएजीआय कडून कोणतीही सिफारीश करण्यात आलेली नाही. त्याचसोबत कोविशिल्डच्या दोन डोस मधील अंतर विज्ञानावर आधारित आहे. याबद्दल कोणतीही समस्या नाही. यासाठी सरकार दोन डोस मधील अंतर कमी करण्याबद्दल ही विचार करत नाही आहे.