India-China Standoff: भारत-चीन मधील तणाव वाढल्याने लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांचा दोन दिवसीय लडाख दौरा; परिस्थितीचा घेणार आढावा
Army Chief General Manoj Mukund Naravane (Photo Credits: Facebook)

भारत-चीन (India-China) मधील तणाव वाढला आहे. पूर्व लडाख मधील पैंगोंग सो (Pangong Tso) झील परिसरामध्ये चीनने केलेल्या घुसखोरीनंतर लष्कर प्रमुख  (Army Chief) जनरल मनोज मुकुंद नरवणे (Manoj Mukund Naravane) हे आज लेह मधील परिस्थिताचा आढावा घेणार आहे. लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे या दौऱ्यात नियंत्रण रेषेजवळील परिस्थितीची पाहाणी करणार आहेत. त्याचप्रमाणे चीनी सैनिकांच्या प्रत्येक हालचालीला सडेतोड उत्तर देण्यासाठी सज्ज होणार आहेत.

न्युज एजेन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, लष्करप्रमुख नरवणे लेह मधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जात आहेत. तिथे वरिष्ठ फ्लिड कमांडर सीमेवरील तणावाची सविस्तर माहिती देतील. सुत्रांच्या माहितीनुसार, लष्करप्रमुख दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतील. या दोन दिवसांत सीमेवरील पाहाणी व्यतिरिक्त सैनिकांच्या तयारीचाही ते आढावा घेतील. (भारतात पबजी, लूडो गेमसह 118 मोबाईल ऍप्सवर बंदी; पाहा संपूर्ण यादी)

ANI Tweet:

भारताने चीनला पैंगोंग मधून सर्व चीनी सैनिकांना हटवण्याचे आदेश दिले होते. परंतु, चीन अशा कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलताना दिसत नाही. सध्या भारतीय सेना पैंगोंग च्या दक्षिणी भागात दबा धरुन बसली आहे. यापूर्वी भारतीय सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चिनी सैनिकांना प्रतिकार केला होता. त्यानंतर चीनकडून पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केला जावू नये म्हणून भारतीय जवानांनी वेढा मजबूत केला आहे.

चीनी सेना पीपल्स लिबरेशन आर्मी (People's Liberation Army) यांच्या द्वारे 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पैंगोंग सो झील मध्ये झालेल्या झटापटीनंतर परिस्थिती अधिक संवदेनशील झाली आहे. दरम्यान दोन्ही सेनांच्या कमांडरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्याासाठी झालेली चर्चा अयशस्वी ठरली. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सीमा जवळपास 4 महिन्यांपासून एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. अनेक स्तरांवरील चर्चेनंतरही परिस्थितीत सुधारणा दिसून येत नाही.