मोदी सरकार सतत भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था (Economy) बनवण्याचा प्रयत्न करीत आहे, तर या दिशेने एक मोठी आणि चांगली बातमी आहे. इंग्लंड (UK) आणि फ्रान्सला (France) मागे टाकून भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था (5th Largest Economy) बनला आहे. अमेरिकन थिंक टँकमध्ये हा दावा केला गेला आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू (World Population Review) नावाच्या या थिंक टँकने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारत आता जागतिक पातळीवर खुल्या बाजारातील अर्थव्यवस्था म्हणून विकसित होत आहे.
अहवालात म्हटले आहे की 2.94 ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीमुळे, भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला आहे. मागील वर्षात या बाबतीत भारताने यूके आणि फ्रान्सला मागे टाकले आहे. देशाने 2.85 कोटी अर्थव्यवस्थेसह युके आणि 2.71 कोटी अर्थव्यवस्थेसह फ्रान्सला मागे टाकले.
या अहवालात पुढे म्हटले आहे की, पर्चेसिंग पॉवर पेरिटी बाबतीत भारताचा जीडीपी 10.51 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे, जो जर्मनी आणि जपानपेक्षा जास्त आहे. मात्र, लोकसंख्येनुसार, भारताचा दरडोई सकल उत्पन्न 2,179 आहे जो अमेरिकेच्या तुलनेत, 62,794 आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की भारतीय अर्थव्यवस्था सलग तिसर्या वर्षी 7.5 ते 5 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते.
(हेही वाचा: अर्थव्यवस्थेवर चहू बाजूने फटका; आठ प्रमुख क्षेत्रांमध्ये मोठी घसरण, जीडीपीनंतर आर्थिक मंदीची दोन मोठी चिन्हे)
या अहवालात असेही म्हटले आहे की, 1990 च्या दशकात भारतात आर्थिक उदारीकरण सुरू झाले. उद्योग नियंत्रणमुक्त केले गेले आणि परदेशी व्यापार आणि गुंतवणूकीवरील नियंत्रणे कमी झाली. तसेच सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्यात आले. या उपाययोजनांमुळे भारताच्या आर्थिक वाढीस वेग आला आहे. अलिकडच्या काळात भारतात बर्याच आर्थिक सुधारणांच्या घटना घडल्या आहेत. 60 टक्के अर्थव्यवस्था आणि 28 टक्के रोजगार असलेले भारतातील सेवा क्षेत्र सर्वात वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. सन 2024 पर्यंत सरकारने भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.