
Bengaluru Murder Case: मेरठमधील सौरभ-मुस्कानचे प्रकरण ताजे असताना आता बेंगळुरू (Bengaluru) मध्ये पत्नीच्या हत्येचे नवे प्रकरण समोर आले आहे. एका भयानक घटनेत, महाराष्ट्रातील एका सॉफ्टवेअर व्यावसायिकाने गुरुवारी बेंगळुरू येथील त्याच्या घरी आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या (Murder) केली आणि तिचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून ठेवला. पीडितेचे नाव गौरी अनिल सांबेकर (वय, 32) असे आहे. ती हुलीमावू पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दोड्डाकन्नम्मनहल्ली येथील रहिवासी आहे. आरोपीचे नाव 36 वर्षीय राकेश राजेंद्र खेडकर असे आहे. त्याच्या मानेवर आणि पोटावर चाकूने वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने स्वतः त्याच्या सासरच्यांना सांगितले की त्याने त्यांच्या मुलीची हत्या केली आहे. यानंतर मुलीच्या वडिलांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की संपूर्ण मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरण्यात आला होता. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दरम्यान, डीसीपी साउथ-ईस्ट बेंगळुरू यांनी सांगितले की, बेंगळुरूच्या दोड्डानेकुंडी गावातील आंबेडकर अपार्टमेंटजवळ 32 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. त्या राकेश राजेंद्र खेडेकर यांच्या पत्नी होत्या. त्याचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडला. पती-पत्नी हुलीमावू पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत होते. दोघेही महाराष्ट्राचे रहिवासी होते. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. (हेही वाचा - Nashik Double Murder: दुहेरी हत्याकांडाने नाशिक शहर हादरले! आंबेडकरवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश जाधव आणि त्यांच्या भावाची चाकूने वार करून हत्या)
पत्नीच्या हत्येनंतर आरोपी फरार -
पत्नीची हत्या करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. प्राप्त माहितीनुसार, हे जोडपे महाराष्ट्राचे होते आणि एक वर्षापूर्वी ते बेंगळुरूला स्थलांतरित झाले होते. तथापि, सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर घरमालकाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि यासंदर्भात माहिती दिली. (हेही वाचा -Ambernath Woman Murder Case: अंबरनाथमध्ये आर्थिक वाद आणि लग्नाच्या तगाद्यामुळे संतापलेल्या तरुणाने केली 35 वर्षीय विवाहित महिलेची हत्या; आरोपीला अटक)
फरार आरोपीला पुण्यात अटक -
पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेने मास मीडियामध्ये पदवी पूर्ण केली होती आणि आरोपी पती एका खाजगी कंपनीत काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर तिचा पती राकेश राजेंद्र खेडेकर शहरातून पळून गेला आणि नंतर त्याला पुण्यात ताब्यात घेण्यात आले. त्याला चौकशीसाठी बेंगळुरूला परत आणले जात आहे, असे पोलिसांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. गुन्हा केल्यानंतर आरोपीने पीडितेच्या पालकांना फोन केला होता. पीडितेच्या पालकांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला, ज्यांनी कर्नाटक पोलिसांना माहिती दिली.