Assembly Elections 2024 Exit Poll : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुका आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांनंतर आता मतदारांना निकालाची प्रतीक्षा आहे. यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. 1 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या 90 जागांवर शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. याआधी 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात आणि 25 सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं होतं. कलम 370 हटवल्यानंतर येथे पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीननसार भाजपचा हरियाणात मोठा पराभव पहायला मिळत आहे. काँग्रेस या ठिकाणी 90 पैकी जवळपास 60 जागांवर काँग्रेसचा विजय होऊ शकतो असे आकडेवारीत सध्या दिसून येत आहे.
इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलने हरियाणात काँग्रेस मोठ्या मताधिक्याने सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवली आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप 19 ते 29 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 44 ते 54 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय इतरांना 5 ते 16 जागा मिळू शकतात.
मॅट्रीसच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला आघाडी मिळताना दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांपैकी काँग्रेस 55 ते 62 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी मतदानानुसार भाजपला 18 ते 24 जागा मिळू शकतात. याशिवाय INLD+ ला 3 ते 6 जागा आणि JJP ला 0 ते 3 जागांची आघाडी मिळत आहे. इतरांना 2-5 जागा मिळू शकतात.
पाहा पोस्ट -
Republic-Matrize Exit Polls 2024 | As per the projection, Congress likely to sweep Haryana Elections 2024
Check the most accurate projections with us on Republic!
Tune in to watch all live updates here - https://t.co/P7L9iWnI9S#RepublicMatrizeExitPolls #HaryanaExitPolls… pic.twitter.com/zE6YX2y05E
— Republic (@republic) October 5, 2024
ध्रुव रिसर्चच्या पोलनुसार, मिळताना दिसत आहे, तर भाजपला 27 जागा मिळताना दिसत आहेत. इतरांनाही सर्वेक्षणात 6 जागा मिळत आहेत. याबाबत भाजप नेते अजय आलोक म्हणाले की, त्यांचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, खरी आकडेवारी मतमोजणीच्या दिवशीच समोर येईल.
In the competitive arena of Haryana, famous for its Sportsmanship, politics is taking turns, our latest exit polls show the INC Alliance on track to secure a clear majority, projected at 57 ± 7 seats. Stay tuned for detailed reports! #HaryanaElections #ExitPoll #HaryanaElections pic.twitter.com/wSEUI61Asp
— Dhruv Research (@dhruvresearch) October 5, 2024
दरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत हरियाणामध्ये 61 टक्के मतदान झाले आहे. मेवातमध्ये सर्वाधिक 68.28 टक्के आणि गुरुग्राममध्ये सर्वात कमी 49.97 टक्के मतदान झाले.