
वेलेंटाईन वीक (Valentine Week) मधील 11 फेब्रुवारी हा पाचवा दिवस प्रॉमिस डे (Promise Day) म्हणून साजरा केला जातो. कपल्स या दिवशी कायम ऐकमेकांची साथ निभावण्याचं वचन एकमेकांना देतात. सुखदु:खामध्ये ते कायम एकत्र राहणार असल्याचं एकमेकांना या दिवशी सांगतात. दरम्यान रिलेशनशीप मध्ये येणार्या चढउतारांमध्ये अनेकदा समोरच्या व्यक्तीला गृहित धरलं जातं. पण प्रॉमिस डे च्या निमित्ताने एकमेकांना आपण एकत्र राहू या वचनाची आठवण करून दिली जाते. मग धावपळीच्या झालेल्या या जगात प्रॉमिस डे पेक्षा एकदा एकमेकांना आठवण करून देण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस कोणता असेल. मग यंदा प्रॉमिस डे च्या निमित्ताने तुमच्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीला सोशल मीडीयामध्ये फेसबूक मेसेजेस,Wishes, HD Images, Greetings द्वारा प्रेमाच्या कबुली सोबत कायम साथ निभावण्याचं वचन देखील नक्की द्या. त्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही ग्रीटिंग्स नक्की शेअर करा.
प्रत्येक नात्याचा गाभा हा विश्वास असतो. मग नात दृढ करण्यासाठी हा विश्वासच महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मग आनंद असो की दु:ख तुमचं नातं कमजोर पडू नये म्हणून विश्वासावर देखील काम करायला शिका. हे देखील नक्की वाचा: Valentine Week and Anti-Valentine 2022 Week Full List: व्हॅलेंटाईन डे पासून ब्रेक-अप डे पर्यंत 'या' महत्त्वाच्या तारखांची यादी ठेवा लक्षात!
प्रॉमिस डे च्या शुभेच्छा

हॅप्पी प्रॉमिस डे

चंद्राचा शीतल गारवा
सोबत प्रेमाचा पारवा
आयुष्यभर तुझा हात हाती हवा
वचन दे मला कधीच येणार नाही आपल्या नात्यात दुरावा
हॅप्पी प्रॉमिस डे

प्रॉमिस डे 2022 च्या शुभेच्छा

हॅप्पी प्रॉमिस डे 2022

प्रत्येक जन्मी तुझ्यासारखी व्यक्ती आयुष्यात मला लाभो
असाच प्रेमाचा वर्षाव सदैव माझ्या आयुष्यात करत राहो
पावलांवर पाऊल ठेवत येईन तुझ्यापाशीच
अन् एका क्षणात मिठीत विरुन जाशील माझ्यापाशीच
Happy Promise Day!

वाऱ्याची झुळुक म्हणून माझ्या आयुष्यात आलीस
मला प्रेमाच्या नशेत बुडवून गेलीस
तुच दिसते मला आता सर्वत्र
साथ हवी आहे मला आता तुझी आजन्म
Happy Promise Day!
वेलेंटाईन वीक मध्ये प्रॉमिस डे नंतर हग डे, किस डे आणि वेलेंटाईन डे साजरा केला जातो. 'प्रेम' ही जगातील सर्वात सुंदर भावनांपैकी एक आहे. त्यामुळे तुम्ही या वेलेंटाईन डे च्या निमित्ताने तुमच्यावर प्रेम करणार्या व्यक्तीची कदर करायला शिका. एकमेकांना समजून उमजूनच नातं खर्या अर्थाने खुलतं त्याला तो वेळ द्या आणि यंदाचा वेलेंटाईन डे तुमच्या खास व्यक्तीसोबत आनंदाने साजरा करा.