Happy Guru Purnima 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्या गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा, पहा ट्विट
Narendra Modi And Rahul Gandhi Wishes On Guru Purnima 2020 (Photo Credits: Facebook)

Guru Purnima 2020 Wishes: आज, 5 जुलै रोजी देशभरात गुरु पौर्णिमेचा (Guru Purnima 2020) सण साजरा केला जात आहे. यंदा कोरोनामुळे (Coronavirus) हे सेलिब्रेशन साध्या स्वरूपातील असले तरी आपल्याला घडवणाऱ्या गुरूच्या प्रतीची भावना महत्वाची असल्याने उत्साह कुठेही कमी झालेला दिसत नाहीये. सकाळपासूनच अनेकांनी आपल्या गुरूंना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. काही वेळेपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुद्धा ट्विटर च्या माध्यमातून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी काल सुद्धा आषाढ पौर्णिमा तिथी सुरु होत असतानाच भगवान गौतम बुद्ध यांना स्मरून गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देताना "जीवनाचे सार्थक करणाऱ्या गुरुजनांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा आजचा खास दिवस आहे या निमित्ताने मी सुद्धा सर्व गुरूंना वंदन करतो" असे ट्विट केले आहे. Happy Guru Purnima 2020 Messages: गुरु पौर्णिमा मराठी शुभेच्छा संंदेश, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून माना गुरूंचे आभार!

नरेंद्र मोदी ट्विट

तर, दुसरीकडे राहुल गांधी यांनी भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेले धडे आठवून शुभेच्छा दिल्या आहेत, बुद्धांच्या संदेशानुसार सूर्य, चंद्र आणि सत्य या तीन गोष्टी कधीही लपून राहत नाहीत, तुम्हा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा असे ट्विट राहुल यांनी केले आहे.

राहुल गांधी ट्विट

दरम्यान हिंदू पुराणानुसार, आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरूंचे गुरु व्यास मुनी यांची जयंती असते, याच निमित्ताने गुरु पौर्णिमा साजरा करण्याची परंपरा आहे. म्हणूनच या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा (Vyas Purnima) असेही म्हंटले जाते. या पवित्र दिनी म्हणजेच गुरु पौर्णिमेच्या निमित्त तुम्हा सर्वांना लेटेस्टली परिवाराकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा!