Dhamma Chakra Din: आषाढ महिन्यातील (Ashadh Purnima) पौर्णिमेला तिथीनुसार आजपासून सुरुवात होत आहे, आषाढ पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा (Guru Purnima 2020) म्हणून साजरी केली जाते. तसेच धम्म चक्र दिन (Dhamma Chakra Din) सुद्धा याच तिथीला साजरा होतो. हेच औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. विश्वगुरू भगवान गौतम बुद्ध (Lord Buddha) यांच्या शिकवणीचे स्मरण मोदींनी केले आहे. बुद्धांनी केवळ भारत नव्हे तर जगभरातील अनेक देशांच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे त्यांच्या आठवणींना स्मरून आपण गुरु पौर्णिमा साजरी करायला हवी असा संदेशही मोदींनी दिला आहे. Happy Guru Purnima 2020 Messages: गुरु पौर्णिमा मराठी शुभेच्छा संंदेश, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून माना गुरूंचे आभार!
ANI या वृत्त संस्थेच्या ट्विट नुसार, मोदींनी म्हंटले की, "गुरु पौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंना वंदन करण्याचा दिवस आहे, ज्यांनी आपल्याला ज्ञान दिले त्यांचा सन्मान यादिवशी करायचा असतो. याच दिवशी धम्म चक्र दिन सुद्धा असल्याने गौतम बुद्धांच्या विचारांना आपण वंदन करायला हवे. बुद्धांनी जगाला अष्टांगिक मार्ग देऊन दिशा दाखवली. विचार आणि आचार यासाठी सोप्पे मार्गदर्शन बुद्धांनी केले आदर आणि अहिंसेचे पाठ शिकवले, जीवनात आशा आणि उद्दिष्ट शुद्ध असण्याचे महत्व पटवून दिले"या साठी त्यांचे स्मरण आवश्यक आहे. 21व्या शतकातील समस्या सोडवण्यासाठी तरुणांनी सुद्धा बुद्धांचे विचार आचरणात आणावेत असे आवाहन मोदींनी पंतप्रधान कार्ययलायाच्या ट्विटर हॅण्डल वरून शेअर केले आहे.
ANI ट्विट
The eight-fold path of Lord Buddha shows the way towards the well-being of many societies and nations. It highlights the importance of compassion and kindness. The teachings of Lord Buddha celebrate simplicity both in thought and action: PM Narendra Modi https://t.co/Ttaj0yWYGl
— ANI (@ANI) July 4, 2020
Today the world fights extra-ordinary challenges. To these challenges, lasting solutions can come from the ideals of Lord Buddha. They were relevant in the past. They are relevant in the present. And, they will remain relevant in the future: PM Modi pic.twitter.com/ZsrfjUeZK2
— ANI (@ANI) July 4, 2020
दरम्यान, पुढे मोदींनी म्हंटले की, "बौद्ध धम्म प्रसारक स्थळांना जोडण्यासाठी वाहतूक मार्ग निर्माण करण्याचा आम्ही (केंद्र सरकार) प्रयत्न करत आहोत. काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिमंडळाने घोषित केले की कुशीनगर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल.यामुळे बरेच लोक, यात्रेकरू आणि पर्यटक येतील व पर्यटनासोबतच विचार प्रसाराला सुद्धा चालना मिळेल".