
आज,8 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या तिथीवर हनुमान जयंती (Hanuman Jayanti) चा सण साजरा केला जाणार आहे. हनुमान हे शक्तीची देवता म्ह्णून ओळखले जातात, सोबतच प्रभू श्रीरामांवरील त्यांची निस्सीम भक्ती आणि समर्पणाची भावना हेदेखील प्रत्येकाने घयावे असे आदर्श आहेत. अंजनी आणि केसरीच्या या पुत्राचा म्हणजेच रामभक्त बजरंगबलीचा आजच्या तिथीवर जन्म झाला होता असे मानले जाते. दरवाराशी यानिमित्त भारतभर विविध ठिकाणी मोठमोठ्या सोहळ्याचे आयोजन केले जाते पण यंदा कोरोनारूपी संकटामुळे घराबाहेर पडून हनुमानाच्या मंदिरात देखील जाण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. अशावेळी लोकांच्या उत्साहाला टिकवून ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी खास ट्विट च्या माध्यमातून भारतवासीयांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नरेंद्र मोदी यांनी ट्विट मध्ये सर्वात आधी हनुमान जयंतीच्या पवित्र तिथीवर समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो असे म्हंटले आहे तर, शक्ती, भक्ती, समर्पण, शिस्त या साऱ्याचे प्रतीक असणारे हनुमान हे आपल्यलाला जीवनात सर्व संकटांचा सामना करण्याचे बळ देतात, संकटाच्या पार जाण्याची प्रेरणा देतात असेही पुढे ट्विट मध्ये लिहिलेले आहे. देशावरील कोरोनाच्या संकटकाळात हे संयमी गुण आणि संकटाला लढण्याची शक्ती आपल्यात येवो अशा शुभेच्छा मोदींनी दिल्या आहेत.
नरेंद्र मोदी ट्विट
हनुमान जयंती के पावन अवसर पर देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। भक्ति, शक्ति, समर्पण और अनुशासन के प्रतीक पवनपुत्र का जीवन हमें हर संकट का सामना करने और उससे पार पाने की प्रेरणा देता है।
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2020
दरम्यान, हनुमान जयंती निमित्त दरवर्षी होणारी सोहळे जरी यंदा रद्द असले तरी हनुमंताच्या प्रतिमेचे किंवा मूर्तीचे पूजन करून हा सण साजरा करू शकता. हनुमानाच्या मूर्तीवर तेलाचा अभिषेक करून रूईची फूलं आणि वडाच्या पानाचा हार अर्पण करा. हनुमान चालीसा पठण करून धूप दाखवून, शुद्ध तुपाचा नैवैद्य दाखवा.