Covid-19 Vaccination Certificate (Photo Credits: Twitter)

कोविड-19 लसीचे (Covid-19 Vaccine) दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना सरकारकडून कोविड-19 लस सर्टिफिकेट (Covid-19 Vaccine Certificate) दिले जात आहे. मात्र हे सर्टिफिकेट सोशल मीडियावर (Social Media) शेअर करणे फसवणूकीचे कारण ठरु शकते. त्यामुळेच सरकारने ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना सावधान केले आहे. कोविड-19 व्हॅसिन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करु नका, असे सरकारने म्हटले आहे.

कोविड-19 व्हॅसिन सर्टिफिकेटवर नाव, वय, लिंग यांसारखी आपली वैयक्तिक माहिती असते. या माहितीचा गैरवापर करुन फ्रॉडर्स फसवणूक करु शकतात. त्यामुळेच व्हॅसिन सर्टिफिकेट शेअर न करण्याचा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे. सायबर दोस्तने ट्विटच्या माध्यमातून या संदर्भातील माहिती देऊन नागरिकांना सावधान केले आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाद्वारे हे ट्विटर हँडल चालवण्यात येत असून सुरक्षितता आणि सायबर क्राईम जागृतीसाठी याचा वापर केला जातो.

Cyber Dost Tweet:

कोविड-19 व्हॅसिनेशन सर्टिफिकेटवर नाव आणि इतर वैयक्तिक माहिती असते. त्यामुळे सोशल मीडिया माध्यमांवर हे सर्टिफिकेट शेअर करुन नका. फ्रॉडर्सकडून याचा गैरवापर होऊन तुमची फसवणूक होऊ शकते, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. (COVID-19 Vaccine Certificate: कोविड 19 लसीचा डोस घेतल्यानंतर Aarogya Setu, CoWIN वरून वॅक्सिन सर्टिफिकेट्स डाऊनलोड कशी कराल?)

कोविड-19 लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर सरकारकडून provisional certificate दिलं जातं. यावर वैयक्तिक माहितीसह दुसऱ्या डोसची तारीखही दिलेली असते. दुसऱ्या डोसनंतर फायनल सर्टिफिकेट नागरिकांना दिलं जातं. हे सर्टिफिकेट म्हणजे तुमचे कोविड-19 लसीकरण झाले आहे, याचा पुरावा असतो. आंतरराष्ट्रीय प्रवासासोबतच इतर महत्त्वाच्या कामांसाठी हे फायदेशीर ठरतं.